राज्यातील संवाद दोन लाख पदे रिक्त

jalgaon-digital
4 Min Read

करोनामुळे पदभरतीची शक्यता मावळली

संगमनेर (वार्ताहर)- राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या विविध संवर्गातील सुमारे सव्वा दोन लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. सदरची पदे भरण्यासंदर्भात कार्यवाहीची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आणि राज्याची आर्थिक स्थिती करोनामुळे दिवसेंदिवस खालावत असल्याने ही भरतीची प्रक्रिया होण्याची शक्यता आता पूर्णत: मावळली.

राज्यात अ श्रेणीतील एकूण 40 हजार पदे सर्व विभागासाठी मंजूर आहेत. त्यापैकी 26 हजार पदे भरलेली आहेत. सुमारे 14 हजार पदे रिक्त आहेत. तर वर्ग दोनची एकूण पदे 1100 मंजूर असून, त्यातील 44 हजार पदे भरलेली आहेत पंचवीस हजार पदे रिक्त आहेत. शासनाच्या अखत्यारीतील चार लाख 78 हजार पदांची मंजुरी असून त्यापैकी 3 लाख 62 हजार पदे सध्या कार्यरत आहेत. क श्रेणीतील 1लाख सात हजार पदे रिक्त आहेत.

राज्यातील दोस्तीसाठी एकूण 1.30 लाख कर्मचारी पदे मंजूर असून त्यातील 80 हजार पदे भरलेली आहेत तर सुमारे 47 हजार पदे रिक्त आहेत. रोजंदारीवरील मानधनावर काम करणारे अंशकालीन व वेतन श्रेणी लागू असलेल्या कर्मचार्‍यांची एकूण 2.71 लाख पदे मंजूर आहेत. मराठी त्यापैकी 2.22 लाख पदे भरण्यात आली असून 38 हजार पदे रिक्त आहेत. राज्यात एकूण नऊ लाख 13 हजार कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सात लाख 34 हजार पदे भरण्यात आलेली आहेत तर दोन लाख 31 हजार पदे रिक्त असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ही पदे भरण्याची शक्यता मावळली आहे.

मेगा भरती थांबणार
मागील सरकारने राज्यातील विविध संवर्गातील 70 हजार पदे भरण्यासंदर्भात घोषणा केली होती. या शासनानेही भरती प्रक्रिये संदर्भात सकारात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली होती मात्र आता आर्थिक घडी विस्कटल्याने ही पदे भरण्याची शक्यता तात्पुरत्या स्वरूपात मावळ्याचे चित्र आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही भरती होणार असली तरी सध्या मात्र आहे त्याच कर्मचार्‍यांना हा भार पेलावा लागणार आहे.

कृषी क्षेत्रातील काम करणारे हात घटताहेत
राज्यात कृषी क्षेत्रात काम करणार्‍या नागरी विभागातील व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र समोर आले आहे राज्यात सध्या 3.2 व्यक्ती कृषी क्षेत्रात कार्यरत असून देशातील हे प्रमाण 5.3 आहे. दुय्यम क्षेत्रात राज्यात 30.4 तर अखिल भारतीय स्तरावर 33.8 इथे प्रमाण आहे.प्रत्येक क्षेत्रात 66.5 चार तर अखिल भारतीय स्तरावर 61.4 इतके हे प्रमाण आहे. राज्यात 35 हजार 580 कार्य तारखेपासून सुमारे 28 87 लाख दैनिक रोजगार उपलब्ध आहेत. राज्यात एकूण पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त रोजगाराची क्षमता असल्याचे प्रमाण 26.1 आहे.

रोजगारात स्त्रियांचे प्रमाण वाढेना
एकीकडे महाराष्ट्रात स्त्री धोरणाचा गाजावाजा होत असला तरी रोजगार क्षेत्रात मात्र स्त्रियांचे प्रमाण फारसे समाधानकारक नसल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात एकूण 72.53 लाख रोजगार उपलब्ध आहेत त्यापैकी महिलांचे प्रमाण अवघे 27.5 टक्के आहे. एकूण रोजगार पैकी 30.1 नऊ टक्के रोजगार आज सार्वजनिक क्षेत्रातील आहे तर उर्वरित रोजगार खाजगी क्षेत्रातील आहे. राज्यात सार्वजनिक क्षेत्रात 22 लाख 25 हजार रोजगार असून खाजगी क्षेत्रात एकूण 50 लाख 78 हजार रोजगार उपलब्ध आहेत. खाजगी क्षेत्रात 13 लाख 92 हजार महिला रोजगार उपलब्ध आहे. राज्यातील एकूण महिला रोजगाराचे प्रमाण 19 लाख 84 हजार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *