राज्यातील धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करा

राज्यातील धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करा

जलसंधारण मंत्री गडाख याचा विभागाला आदेश

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विभागाला दिल्या आहेत. श्री. गडाख म्हणाले, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व धरणांचा मान्सूनपूर्व तपासणी अहवाल वेळीच सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी, तसेच धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात व धोकादायक धरणे सुस्थितीत येतील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी,.याबाबत कुठालाही हलगर्जीपणा होणार नाही यासाठी दक्ष रहावे.

मान्सून पूर्व धरण तपासणी तसेच धोकेदायक धरणांना सक्षम अधिकार्‍यांनी भेटी देऊन आवश्यक उपाययोजना करणे ही अत्यावश्यक बाब म्हणून गृहीत धरण्यात यावी, मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित पूर्ण झालेल्या व पाणीसाठा होत असलेल्या योजनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्याने करावयाची कार्यवाही व उपाययोजनांसाठी देण्यात आलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे असे श्री. गडाख यांनी सांगितले.

पावसाळ्यादरम्यान धरणफुटी अथवा क्षतिग्रस्त होण्याची घटना उद्भवू नये यासाठी प्राधान्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत पत्राद्वारे सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. महसूल, पोलीस व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मान्सुनपूर्व दुरुस्ती करणे, तलावालगतच्या मनुष्यवस्तींना सूचना देणे, प्रथम पाणीसाठा करताना घ्यवयाची काळजी या सर्व बाबींविषयी येणार्‍या पावसाळ्यापुर्वी प्रथम प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मान्सूनपूर्व धरणाच्या तपासणी करीता मृद व जलसंधारण प्रादेशिक मुख्य अभियंता, यांच्या पत्राव्दारे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा अधीक्षक अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग व त्यांचे अधिपत्याखालील क्षेत्रिय कर्मचारी यांना कोविड-19 आजार व कोरोना या विषाणूच्या संसांर्गाच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचना व घ्यावयाचीच सर्व दक्षता यांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यासाठी प्रवास करण्यास विशेष बाब म्हणून अनुमती देण्यात आली असल्याचे श्री. गडाख यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com