एसटीच्या राज्य स्पर्धेत ‘द ग्रेट एक्सचेंज’ अव्वल
Featured

एसटीच्या राज्य स्पर्धेत ‘द ग्रेट एक्सचेंज’ अव्वल

Sarvmat Digital

दिग्दर्शन, अभियन, नेपथ्यासह विविध पारितोषिक

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय  अहमदनगर विभागाच्या क्षितिज झावरेलिखित आणि किशोर पराते दिग्दर्शित ‘द ग्रेट एक्सचेंज’ या नाटकाने विविध वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली.

किशोर पराते यांनी उत्कृष्ठ अभिनयासह दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तसेच नेपथ्यातही प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासाठी निलेश चांदणे, शोभा चदणे, सचिन घोडके यांना पारितोषिक मिळाले. राजू घोरपडे, अभय गोले यांना अभिनयात उत्तेजनार्थ मिळाले.

सातारा येथे झालेल्या अंतिम फेरीत ‘द ग्रेट एक्सचेंज’ नाटकाचा प्रयोग चांगलाच गाजला. 26 वर्षानंतर दिग्दर्शन आणि अभिनयाचे रौप्य पदकाचा बहुमान किशोर पराते यांच्या रुपात अहमदनगरला मिळाला. स्व. अनिल तथा बालिकाका क्षीरसागर यांना 26 वर्षापूर्वी हा मान मिळाला होता. सोलापूर येथे झालेल्या प्राथमिक फेरीतही या नाटकाने दिग्दर्शन, अभिनयासह सांघिक प्रथम ही पारितोषिके पटकावली होती.

या यशात निर्मिती प्रमुख विजय गिते (विभाग नियंत्रक), निर्मिती सूत्रधार सचिन भुजबळ (कामगार अधिकारी), व्यव्स्थापन कामगार कल्याण समिती यांचे योगदान मोठे आहे. कलाकार म्हणून अभय गोले, गोविंद पीडियार, राजेश घोरपडे, जयदेव हेंद्रे, शोभा नांगरे, स्वरूपा वैद्य, संदीप शिंदे, सुरेश गिते, अरुण वीरकर, बापू शिंदे, जाकिर शेख, काका आवचिते, सचिन घोडाके, निलेश चांदणे यांचेही योगदान होते. जालिंदर शिंदे, सागर मेहेत्रे, नाना मोरे, आबा सैंदाणे, मुन्ना सय्यद, सचिन इंदलकर, सुनील वणवे, शैलेश देशमुख, गणेश लिमकर, अशोक अकोलकर, चेतन ढवळे यांनी तांत्रिक सहकार्य केले.

महाराष्ट्र्र शासन आयोजित राज्यनाटय स्पर्धा, बाल राज्यनाटय स्पर्धा, पुरूषोत्तम स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक, थेस्पो करंडक या सहा राज्यातील विविध स्पर्धेत सातत्याने यश या पाठोपाठ महाराष्ट्र्र मार्ग परिवहन स्पर्धेतील यश अहमदनगरच्या नाटय व सांस्कृतिक क्षेत्रासाठी बहुमान असल्याचे गौरवोदगार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान यांनी काढले.

विजेत्या नाटय संघाचे नाटय परिषदेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमोल खोले, माध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य सतीश शिंगटे, अभिनेते प्रकाश धोत्रे, प्रसाद बेडेकर, बलभीम पठारे, संजय घुगे, श्रेणिक शिंगवी, संदीप दंडवते, स्वप्नील मुनोत, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, बाळकृष्ण ओतारी, दीपक घारू, लेखक सदानंद भणगे, अनंत जोशी, संजय आढाव, शिरीष जोशी, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, बालरंगभूमी परिषद अध्यक्षा उर्मिला लोटके, नाट्यकर्मी राहुल सुराणा, शिवाजी कराळे, दत्ता पवार, अनंत रिसे, अविनाश कराळे, राम पाटोळे, स्वप्नील नजान, दीपक बडवे यांनी अभिनंदन केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com