राज्य परिवहन महामंडळाचे डेपो तीर्थस्थळावर उभारणार – ना. परब

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात राज्य परिवहन महामंडळाचे 50 डेपो उभरण्याची मागणी सरकारकडे केली आहे, प्रत्येक धार्मिक तीर्थस्थळावर डेपो उभारण्यात येणार असून आज याची सुरुवात नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

शिवसेनेचे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ना. परब यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, शिवसेना शहरप्रमुख सचिन कोते, अमोल गायके आदी पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

दर्शनानंतर ना. परब पत्रकारांशी संवाद साधताना एस. टी संदर्भात अनेक मुद्दे मांडले. तसेच रत्नागिरी रिफायनरीला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र आज त्याची जाहिरात काढण्यात आली आहे तो उत्पन्नाचा भाग असल्याच स्पष्टिकरण त्यांनी माध्यमांशी बोलतांना केले. राज्यात 50 डेपो उभरण्याची मागणी सरकारकड़े केली आहे प्रत्येक धार्मिक तीर्थस्थळावार डेपो उभरण्यात येणार असून आज याची सुरुवात नाशिक त्रंबकेश्वर येथून करण्यात येणार आहे त्याआधी साईबाबांंच्या दर्शनासाठी आलो आहे.

राज्यात शिवशाही बसेसचे जेे काही अपघातात होत आहे त्याची मी कारणे शोधली आहे, त्या खाजगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. त्यांनी किती फायदा करुन दिला याचा आणि स्वत: मंडळाने या चालविल्या तर कसे राहील याचा अभ्यास करत असल्याचे सांगत त्यानंतर शिवशाही बसबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील सरकार पडणार असल्याचे म्हणत आहेतश्र यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की विरोधकांना दिवसा स्वप्न पडत असतात. अशा स्वप्नांना आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगितले. दरम्यान अडीच हजार बस निकामी झालेल्या आहेत त्यातील काही बस दुरुस्त करण्यात आल्या असून दोन हजार बस पूर्णपणे निकामी झाल्या असल्याने रिप्लेसमेन्टसाठी पाठवल्या जाणार असल्याची माहिती ना. अनिल परब यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *