थुंकणार्‍या व मास्क न लावणार्‍या 14 जणांवर पालिकेची दंडात्मक कारवाई
Featured

थुंकणार्‍या व मास्क न लावणार्‍या 14 जणांवर पालिकेची दंडात्मक कारवाई

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)ः- श्रीरामपूर शहर हद्दीत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या व चेहर्‍यावर मास्क न लावणार्‍या 14 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व चेहर्‍यावर कायम मास्क/रुमाल अथवा इतर कापड वापरणे गरजेचे आहे, यांचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून तसेच जो कोणी व्यक्ती चेहर्‍यावर मास्क किंवा रुमाल लावणार नाही तसेच रस्त्याच्या / सार्वजनिक ठिकाणी थुंकेल अशा व्यक्तींना प्रथम आढळल्यास 500 रुपये दंड व दुसर्‍यांदा आढळल्यास 1000 रुपये तर तिसर्‍यांदा आढळल्यास 2000रुपये दंड व फौजदारी कार्यवाही करणेकामी नगरपरिषदेने एक पथक नियुक्त केलेले आहे.

या पथकाने गोपाळ दरंदले 500 रुपये, अझरुद्दीन शेख 500रुपये, प्रकाश कणसे 500 रुपये, त्रिलोक एंटरप्रायझेस 500 रुपये, अन्वर सय्यद 500 रुपये, वर्धमान ट्रेडर्स 500 रुपये, नितीन चौधरी 200 रुपये, चारमिनार मेडिकल 500 रुपये, नरेंद्र मेडिकल 500 रुपये, आर. ए. गुप्ता 500रुपये, व प्रिन्स मेडिकल 200 रुपये या नागरिकांविरूद्ध रस्त्यावर थुंकणे व चेहर्‍यावर मास्क, रुमाल अथवा इतर कापड न लावल्याचे आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे अन्यथा भादंवि 1860 च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत होणार्‍या कार्यवाहीस बळी पडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी समीर शेख यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com