Friday, April 26, 2024
Homeनगरसमाज माध्यमाद्वारे अभ्यासात सुमारे 400 शाळांचा सहभाग

समाज माध्यमाद्वारे अभ्यासात सुमारे 400 शाळांचा सहभाग

संगमनेर (वार्ताहर)- देशभरात करून विषाणूचा प्रभाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र या सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी शाळा स्तरावर ती शिक्षकांनी समाज माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. नगर जिल्ह्यात सुमारे 400 शाळांनी अशा प्रकारचा सहभाग नोंदविला आहे.

सध्या शाळांना सुट्टी आहेत विद्यार्थी घरीच रहावेत. यासाठी त्यांना अभ्यासाची गरज होती ही बाब लक्षात घेऊन काही शिक्षकांनी व्हाट्सअप सारख्या समाज माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या पालकांना नियमित घ्यावा याचा अभ्यास उपलब्ध करून दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरात ठेवणे पालकांना कसे सोपे गेले आहेत दिवसभर विद्यार्थी घरात बसून काय करणार असा प्रश्न सतत असताना शिक्षकांच्या कल्पकतेमुळे विद्यार्थी रोजच अभ्यासात गुंतून राहिल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

अशा समाज माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेल्या शाळांची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने एक लिंक द्वारे मागविण्यात आली होती. त्या लिंकला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 343 शाळांनी आपल्या प्रयोगाची माहिती लिंकद्वारे भरली आहेत. यात नेवासा-19, श्रीरामपूर-19, नगर-34, पारनेर-55, श्रीगोंदा-26, राहता-15, संगमनेर-64, पाथर्डी-20, कर्जत-21, राहुरी-28, जामखेड-3, कोपरगाव-20, अकोले-10, शेवगाव-9 आदि शाळांचा समावेश आहे.

अधिक शाळांचा समावेश शक्य सुट्टीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यी अभ्यासापासून दुरावू नये यासाठी शिक्षकांनी व्हाट्सअप माध्यमातून, तसेच सुट्टीचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास घेऊन विद्यार्थ्यांना गुंतून ठेवले आहेत. या संदर्भातील माहिती लिंकद्वारे संकलित करण्याचे काम सुरू आहेत. यासंबंधी त्यांनी केलेल्या प्रयोगाचे एकत्रीकरण करून त्यातील उत्तम प्रयोगाचे सार्वत्रिकीकरण करून गुणवत्ता विकासात सहभाग घेता येणार आहे. सध्या या माहितीचे संकलन चे काम सुरू असून जिल्ह्यातील सर्वच प्रयोगशील शाळांची माहिती यानिमित्ताने संकलित होणार आहे. याचा फायदा गुणवत्ता विकासात होणार असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सांगितले.

राज्यातही सुरू आहेत विविध प्रयोग-
सध्या अचानक शाळांना सुट्टी मिळाली असल्यामुळे व बाहेरील वातावरणात कोरोनाचा धोका असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी विविध सामाजिक प्रयोग करण्यास सुरू केली आहेत. त्यानुसार काही शिक्षकांनी यू ट्यूब चैनल द्वारे, काही शिक्षकांनी व्हाट्सअप द्वारे, काही शिक्षकांनी व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली आहे. काही शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधत असून त्यांना समाजिक माध्यमातून अभ्यासासाठी प्रेरित करत असल्याचे चित्र आहे. विविध सामाजिक माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेण्याच्या प्रयोगाचे राज्यभर कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या