विश्वासघात करून सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे काम बिघडविणारे जुगाड सरकार

jalgaon-digital
4 Min Read

मा.आ. स्नेहलता कोल्हेः कोपरगावात निषेध मोर्चा

कोपरगाव (प्रतिनिधी)- खोटी आश्वासनं, भूलथापा आणि भाजपचा विश्वासघात करून सत्तेवर आलेले महा विकास आघाडीचे जुगाड सरकार काम बिघडवणारे आहे. कुठं नाईट लाईफ घेऊन बसलात, येथे शेतकर्‍यांना दिवसा लाईट नसल्याने त्याचा लाईफ खराब होत आहे. शेतकर्‍यांचा सातबारा उतारा कोरा करू असे आश्वासन देऊन त्यांना फसवणार्‍या निष्क्रिय महा विकास आघाडी सरकारचा निषेध माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला.

तहसील कार्यालयासमोर कोपरगाव शहर व तालुका भाजप तसेच मित्र पक्षाच्यावतीने मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी दिवसभर धरणे आंदोलन करून तहसीलदार योगेश चंद्र यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके व भाजपा तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी रमेश औताडे, रवींद्र आगवण, दीपक चौधरी, सुधाकर गाढवे, डॉ.गोरख मोरे, अनुराग येवले, बाळासाहेब अहिरे, विनोद राक्षे, बाळासाहेब वक्ते, कैलास राहणे, एकनाथ फापाळे, लक्ष्मणराव पानगव्हाणे, शिवाजीराव लहारे, स्वप्निल निखाडे, योगीता होन, विक्रम पाचोरे, दीपक गायकवाड, केशव भवर, श्वेतांबरी राऊत, सुनील देवकर, मच्छिंद्र टेके, यांनी महा विकास आघाडी सरकारच्या कारभाराची लक्तरे काढून त्यांचा निषेध केला.

याप्रसंगी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे, शिल्पाताई रोहमारे विद्या सोनवणे, वैशाली सोनवणे, सुनीता संवत्सरकर, हर्षदा कांबळे, मंगलताई आढाव, वैभव आढाव, सहकार महर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, गटनेते रवींद्र पाठक, विजय वाजे, मनोहर शिंदे, सुधाप्पा कुलकर्णी, चांगदेव असणे, नानासाहेब गव्हाणे, रामदास राहणे, कैलास खैरे, बाळासाहेब पानगव्हाणे, अरुण येवले, ज्ञानेश्वर परजणे, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, सुभाषराव आव्हाड, सत्येन मुंदडा, बबलू वाणी, शरद थोरात, निवृत्ती बनकर, त्र्यंबकराव सरोदे, संभाजी रक्ताटे, सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, हरिभाऊ गिरमे, दीपक जपे, नारायण अग्रवाल, इलियास खाटीक, जितेंद्र रणशूर, सखाराम निकम, खलील कुरेशी, मोहम्मद पहिलवान, उत्तमराव चरमळ, बाळासाहेब दीक्षित, भाऊसाहेब चौधरी, शिवाजीराव कोकाटे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते ,महिला,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसील कचेरीवर धरणे धरण्यात आले. संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे म्हणाले, गोदावरी कालवे पाटपाणी नियोजनाचा अभाव आहे. धरणात पाणी असून ते मिळत नाही. उभ्या पिकांची ज्यावेळेस सोंगणी सुरू होईल त्यावेळी रब्बी आवर्तन काय कामाचं. 35 लाख शेतकरी कर्जदार असताना केवळ 15 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन बोळवण केली आहे. दोन लाखांच्या वर कर्जदार शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

आम्ही सत्तेचे कधी गर्व केला नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरली आणि आता पूर्वीच्या शासनाने केलेली विकास कामे बंद करून खोडा घालण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याला आडवे पाडून जात विचारू. पाच नंबर साठवण तळ्याच्या कामाबाबत गोबेल्स नीतीचा अवलंब केला जात आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही सुरुवात केली आहे. सुधारणा झाली नाही तर क्रांती करून प्रश्न सोडवू.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात अनेकांनी गरळ ओकली. एक महिला म्हणून आपली अडवणूक केली. राज्याचे गृहखाते झोपले आहे त्यामुळे महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार वाढत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. हेक्टरी 25 हजार रुपये अवकाळी मदत देऊ म्हणून घोषणा करणारे आता मूग गिळून बसले आहेत.

जाती-जातीत तेढ निर्माण करून स्वार्थासाठी भाजप व पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. पण संविधान हेच अंतिम असून त्यानुसारच मोदी यांचे काम सुरू आहे. आम जनतेने व मुस्लिम बांधवांनी गैरसमजुतीच्या प्रचारावर विश्वास ठेवू नये आपल्याविषयी कुणी कन्फ्युज करून मजल मारू पहात असेल तर ते चांगलं नाही. एकजूट आणि एक मूठ ठेवा असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी शासनाच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध केला. सूत्रसंचालन व आभार सुशांत खैरे यांनी मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *