संकटात खचू नका, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही- सिंधूताई सपकाळ
Featured

संकटात खचू नका, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही- सिंधूताई सपकाळ

Sarvmat Digital

कोपरगाव (प्रतिनिधी) – जीवनात कितीही संकटे आली तरी खचून न जाता परिस्थितीला सामोरे गेले तर जीवनात यश मिळाल्याशिवाय रहात नाही. महिलांनी, मुलींनी कितीही शिक्षण घेतले तरी आपले संस्कार, संकृती, वेशभूषा, परिवार यांचा विसर पडू देऊ नये, असा मोलाचा सल्ला सिंधूताई सपकाळ यांनी दिला. स्वतःचा जीवन संघर्ष कथन करून उपस्थितांना अंतर्मुख केले.

नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित, अनाथांची माय डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मकथन आईच्या काळजातून जगण्यासाठी बळ देणारे सेवाभाव जागविणारे प्रेरणादायी आत्मकथन उत्साहात झाले.

याप्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, महिला व बालकल्याण समिती सभापती ताराबाई जपे, राजेशजी परजणे, विजय वाजे, अनिल आव्हाड, स्वप्नील निखाडे, मंगला आढाव, विद्याताई सोनवणे, सपना मोरे, वर्षा शिंगाडे, प्रतिभा शिलेदार, मंदार पहाडे, विरेन बोरावके, संदीप वर्पे, महमूद सय्यद, अयाज शेख, वर्षा कहार, हर्षा कांबळे, उमा वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे आदी उपस्थित होते.

यावेळी कोपरगाव नगरपरिषदेच्या सफाई कामगार ते मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष प्रत्येकांनीच भरीव असे योगदान स्वच्छ भारत अभियान व जलशक्ती अभियानात दिले आहे. सफाई कामगार सुमन दगडू ठोकळ, शिला भरत चावरे व शकीला जहूर सय्यद यांचा सन्मान करण्यात आला.

शहरातील नागरिकांनी व संस्थांनी स्वच्छ भारत अभियान व जलशक्ती अभियानात भरीव योगदान दिल्याबद्दल नगरपरिषदेच्यावतीने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागाचे प्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन महारुद्र गालट तर आभार उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी मानले.

Deshdoot
www.deshdoot.com