श्रीरामपूर शहरात दोन गटांत हाणामारी
Featured

श्रीरामपूर शहरात दोन गटांत हाणामारी

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील मेनरोडवर काल रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. 15 ते 20 दिवसांपूर्वी याच ठिकाणी रात्री 11 वाजेच्या सुमारास हाणामारी झाली होती.

काल रात्री आठ वाजेच्या सुमारास मेनरोडवरील भगतसिंग चौकात अचानक दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात वाद होऊन भांडणे सुरु झाली. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. मात्र ही हाणामारी नेमकी कुठल्या कारणावरुन झाली हे समजू शकले नाही. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जमाव पांगला.

दरम्यान, शहरातील गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. मात्र या घटनांमुळे शहरात अशांतता पसरत चालली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलिसात तक्रार दाखल नव्हती.

Deshdoot
www.deshdoot.com