श्रीरामपुरातील ‘त्या’ अकरा जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

श्रीरामपुरातील ‘त्या’ अकरा जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

खासगी रुग्णालयात आलेल्या 39 रुग्णांची होम क्कारंटाईनची प्रक्रिया सुरु

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या नेवासा येथील रुग्णाची तपासणी करणार्‍या श्रीरामपूर शहरातील ‘त्या’ दोन डॉक्टरांसह थेट संपर्कात आलेल्या आठ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. त्यांचे अहवाल आज सकाळी येण्याची अपेक्षा आहे.

नेवासा येथील जो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याला श्रीरामपूर शहरातील एका नामवंत डॉक्टरांनी तपासले होते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या दोन डॉक्टरांसह आठ जणांच्या घशाचे श्राव पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह यावेत अशी अपेक्षा श्रीरामपूरकर करत आहेत. अन्यथा तालुक्यात मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, शहरातील ज्या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेवासा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीसाठी आला होता. त्या दिवशी सदर हॉस्पिटलमध्ये सुमारे 39 पेशंट त्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी आले होते. या यादीनुसार त्या पेशंटचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांना होम क्कॉरंनटाइन करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com