Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपुरात ‘क्वारंटाईन’चे राजकारण

श्रीरामपुरात ‘क्वारंटाईन’चे राजकारण

नगराध्यक्षा आदिक यांची मानवाधिकार आयोगाकडे तर बडदेंची मातोश्रीकडे धाव

वैद्यकीय अधिकार्‍यांचे क्वारंटाईन व्यक्तीद्वेशातून : चित्ते

- Advertisement -

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोना च्या पाश्वभूमीवर संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’ असताना श्रीरामपुरात मात्र क्कारंटाईचे राजकारण सुरु झाले आहे. त्याचा बळी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधिकक्ष ठरल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वैद्यकीय अधिक्षकांना मिंळत असलेल्या वागणुकीबाबत नगराधक्षा अनुराधा आदिक यांनी आरोग्य मंत्री तसेच मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. तर भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याला दिल्या जाणार्‍या वागणुणीचा निषेध केला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख सचीन बडदे यांनीही मातोश्रीकडे धाव घेतली आहे.

पुरवणार्‍या यंत्रणेच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम होईल. नेवाशाच्या कोरोना पेशंटच्या संपर्कात आलेल्या ग्रामीण रुग्णालयातील 13 जणांना तपासणीसाठी नगर सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले होते. त्यातील 8 लोकांना त्याच दिवशी तपासणी करून श्रीरामपूरला पाठवून दिले. यातील 5 जणांना नगर येथे क्वारंनटाइन केले होते. या पाच जणांना व लोणी येथे ठेवलेल्या 3 जणांना अशा एकूण 8 जणांना 16 एप्रिल रोजी श्रीरामपूरला आणून ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाइन केले होते. या सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.

मात्र केवळ व्यक्तीद्वेषापोटी, राजकारणातून व मनात राग धरून एकट्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षकांना दि. 20 एप्रिल रोजी नगरला हलविले व सिव्हिल हॉस्पिटल येथे न ठेवता भिंगार जवळील मदरशांमध्ये नेऊन ठेवले. तेथे त्यांना साधी सतरंजी देऊन जमिनीवर झोपविले आहे. अशा पद्धतीने वैद्यकीय सेवेतील अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यास अमानुषपणे वागविणे हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाच्या अशा व्यक्तीद्वैषी भूमिकेमुळे कोरोना विरुद्ध लढणार्‍या आरोग्य सेवकांच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्री. चित्ते यांनी दिला आहे.

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वसंतराव जमदाडे यांना जी वागणूक देण्यात येत आहे याबाबत मी मातोश्री वर संपर्क साधून पक्षाचे सचीव अनिल देसाई यांना तसेच आरोग्य मनत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत नगर जिल्हा प्रशासनास सूचना करण्याचे आश्वासन दिले आहे.
– सचिन बडधे, श्रीरामपूर शिवसेना शहरप्रमुख

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वसंतराव जमदाडे यांची नगर येथे क्कारंटाईन केलेल्यांची काळजी घेण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात नगरला नेमणूक केलेली आहे. याबाबत श्रीरामपूरमधून काही तक्रारी आल्याने मी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी फोनवर बोललो आहे. त्यांना पुन्हा श्रीरामपूरला पाठवा अशी मागणी मी केली आहे. याबाबत आ. डॉ. सुधीर तांबे ही जिल्हाधिकार्‍यांशी बोलले आहेत.
– आ. लहू कानडे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ.

लॉकडाऊनच्या काळात डॉ. वसंतराव जमधडे यांनी तालुक्यात व शहरात जनतेला आरोग्याबाबत चांगले मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी व त्यांच्या टीमने तालुक्यात आढळलेल्या संशयित रुग्णांच्या घरी जाऊन, वेळेचा विचार न करता चांगली कामगिरी केली आहे. त्यांना अगोदरच क्वारंटाइन केलेले असताना, त्यांना नगर येथे एका ठिकाणी काही संशयित पेशंटची काळजी घेण्यासाठी ठेवले असल्याचे समजते. या कारणाने भविष्यामध्ये श्रीरामपूरसाठी धोका वाटत आहे. त्यामुळे डॉ. जमधडे यांची नगर येथे केलेली तात्पुरती नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
– अनुराधाताई आदिक, नगराध्यक्षा, श्रीरामपूर नगरपालिका.

- Advertisment -

ताज्या बातम्या