श्रीरामपूरच्या तरुणाची लोणीत हत्या; पसार आरोपी उमेश नागरेला अटक
Featured

श्रीरामपूरच्या तरुणाची लोणीत हत्या; पसार आरोपी उमेश नागरेला अटक

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीरामपूरच्या फरदीन आब्बू कुरेशी या युवकाला बळजबरीने नाशिक येथे नेऊन व नंतर लोणी येथे आणून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. यागुन्ह्यातील पसार असलेला आरोपी उमेश भानुदास नागरे (वय- 33 रा. लोणी ता. राहाता) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेेरबंद केले आहे.

या गोळीबार प्रकरणात यापूर्वी सिराज उर्फ सोल्जर आयूब शेख, संतोष सुरेश कांबळे, शाहरूख उस्मान शहा (तिघे रा. बीफ मार्केट जवळ, श्रीरामपूर) व अरुण भास्कर चौधरी (रा. लोणी ता. राहाता) यांना अटक केली आहे. तर, अक्षय बनसोडे व शुभम कदम (रा. लोणी ता. राहाता) अद्याप पसार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.सिराज शेख, संतोष कांबळे, शाहरूख शहा यांनी फरदीन कुरेशी या युवकाला जबरदस्ती करून व धमकी देऊन येथे घेऊन गेले होते.

नाशिक येथून फरदीनला लोणी येथे आणून तिघां आरोपींनी त्यांचे साथीदार उमेश नागरे, अरूण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम यांना बोलावून घेतले. तेथे फरदीन यांची वादाच्या कारणातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी फरदीन यांची आई आशा कुरेशी यांनी 1 डिसेंबर 2019 रोजी लोणी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा घेत असताना उमेश नागरे हा सावरगाव (ता. काटोल जि. नागपूर) येथे मित्राकडे राहत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शिरीषकुमार देशमुख, सहायक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलिस हवालदार दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, आण्णा पवार, रवींद्र कर्डीले, संदीप दरंदले, रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, बबन बेरड यांच्या पथकाने नागरे याला सावरगाव येथे अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला लोणी पोलिसांकडे देण्यात आले आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

उमेश नागरे सराईत गुन्हेगार
युवकाची गोळीबारातून हत्या केल्या प्रकरणी अटक केलेला आरोपी उमेश नागरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांच्या विरोधात आश्वी, जामखेड, नाशिक रोड, लोणी या पोलिस ठाण्यात दरोडा, दरोड्या दरम्यान हत्या करणे, सरकारी कामात अडथळा, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हे दाखल आहे.

Deshdoot
www.deshdoot.com