श्रीरामपूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत
Featured

श्रीरामपूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये काल पहिल्या टप्प्यात 13 ग्रामपंचायतींसाठी सोडत निघाली. तर उर्वरित ग्रामपंचायतींची सोडत आज दि. 5 फेबु्रवारी रोजी निघणार असल्याची माहिती नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी दिली.

बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत- वॉर्ड नंबर 1 ओबीसी स्री, सर्वसाधारण स्री, सर्वसाधारण व्यक्ती, वॉर्ड नंबर 2- अनु. जाती स्री, सर्वसाधारण स्री, ना.मा.प्र. व्यक्ती, वॉर्ड नंबर 3- ना.मा.प्र. स्री, सर्वसाधारण व्यक्ती, वॉर्ड नंबर 4 -अनु. जमाती स्री, ना.मा.प्र. स्री, सर्वसाधारण व्यक्ती, वॉर्ड नंबर 5 – अनु. जाती स्री, ना.मा.प्र. व्यक्ती, सर्वसाधारण व्यक्ती, वॉर्ड नंबर 6 – सर्वसाधारण स्री, अनु. जाती व्यक्ती, सर्वसाधारण व्यक्ती तर गळनिंब ग्रामपंचायत– वॉर्ड नंबर 1- अनु जमाती व्यक्ती स्त्री/पुरुष, सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री, वॉर्ड नंबर 2- सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री, ना.मा.प्र.स्त्री, वॉर्ड नंबर 3- ना.मा.प्र. पुरुष, सर्वसाधारण स्त्री, अनु जाती स्त्री अशी सोडत निघाली असून व्यक्ती म्हणजे त्या जागेवर स्त्री किंवा पुरुष उमेदवार उभा राहू शकतो. यामध्ये अनुसूचीत जमाती 1 जागा, अनुसूचीत जाती 1 जागा व ना.मा. प्र. वर्ग 2 जागा, स्त्रीयांसाठी 5 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मातापूर ग्रामपंचायत- वॉर्ड नं 1-ना.मा.प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष, वॉर्ड नं.2- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष, वॉर्ड नं 3- सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण महिला व मागासप्रवर्ग महिला असे आरक्षण निघाले. तर

मांडवे ग्रामपंचायत – वॉर्ड नंबर 1. सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री, वॉर्ड नंबर 2- सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री, ना.मा. प्र. व्यक्ती, वॉर्ड नं. 3- ना.मा.प्र. स्त्री, सर्वसाधारण स्री, अनु जमाती व्यक्ती असे आरक्षण जाहीर झाले आहे. व्यक्ती म्हणजे त्या जागेवर स्त्री किंवा पुरुष उमेदवार उभा राहू शकतो. अनुसूचीत जमाती 1 जागा, ना.मा. प्र. वर्ग स्त्री 1 जागा, ना.मा.प्र. वर्ग पु 1 जागा, सर्वसाधारण व्यक्ती 2 जागा, सर्वसाधारण स्त्री 4 जागा स्त्रियांसाठी 5 जागा राखीव एकूण 9 जागा आहेत.याशिवाय भेर्डापूर, ब्राम्हणगाव वेताळ, गोंडेगाव, कारेगाव, कुरणपूर, लाडगाव, मातुलठाण व पढेगाव ग्रामपंचायतीचेही आरक्षण निघाले आहे. तर उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत आज निघणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com