Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील खंडकर्‍यांच्या जमिनीची मोजणी 1 जूनपासून

श्रीरामपुरातील खंडकर्‍यांच्या जमिनीची मोजणी 1 जूनपासून

उक्कलगाव, बेलापूर बुद्रुक, भैरवनाथ नगर, खंडाळा, निपाणी वडगाव, वळदगाव, ऐनतपूरचा समावेश

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- गेली अनेक वर्षे लांबणीवर पडलेल्या शेती महामंडळाच्या श्रीरामपूर तालुक्यातील काही ठिकाणी जमिनी वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात श्रीरामपूर भूमि अभिलेख कार्यालयाने जमिनीचे वाटप करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार केला आहे. याची सुरूवात 1 जून 2020 पासून होत आहे.
उक्कलगावात 28 गटांची मोजणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्यानुसार 2115.62 हेक्टर आर क्षेत्राचा समावेश आहे. बेलापूर बुद्रुक येथे 8 गटांची मोजणी करण्यात येणार आहे. यात 45.61 हेक्टर आर क्षेत्राचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी 1 जून 2020 ते 10 जून2020 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासाठी नितीन मडके, जयदीप गाढे, धमेंद्र जाधव, अभय कुलकर्णी या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

भैरवनाथनगर गटांची संख्या 2 असून 19.12 हेक्टर आर, निपाणी वडगाव 2 असून 17.65, खंडाळा 2 गट, 9.40 हेक्टर आर, वळदगाव 4गट, 23.16 हेक्टर आर. ऐनतपूर 8गट, 32.01 हेक्टर आर जमिनीचा समावेश आहे. या गावांची प्रक्रिया 1 जून ते 10 जून 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. या गावांसाठी गजानन पंडित, भास्कर हराळ यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भातले नियोजन भूमि अभिलेख उपअधीक्षक नरेंद्र पाटील यांनी जिल्हा अधिक्षकांना पाठविले आहे.

दरम्यान, महामंडळाच्या खंडकरी शेतकर्‍यांना जमीन वाटप करण्यात येऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. एका ऐतिहासिक लढ्याची सांगता झाली असली तरी अद्यापही काही शेतकर्‍यांच्या सर्व अपेक्षांची पूर्ती झालेली नाही. जमीन मोजणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची कमतरता तसेच जमीन वाटपाबाबत काही ठिकाणी एकमत होत नसल्याने जमीन वाटपाची प्रक्रिया लांबली होती. आता या मोजणीला मुहूर्त लागला असून खंडकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या