Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर : 21 जणांपैकी दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

श्रीरामपूर : 21 जणांपैकी दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोवर्धन येथील कोरोना पॉझिटीव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या 21 व्यक्तींना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंतराव जमदाडे यांनी दिली.

गोवर्धन येथील एका तरुणास कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभाग खडबडून जागा होऊन त्या तरुणाच्या संपर्कातील सुमारे 21 व्यक्तींना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बाकीच्या व्यक्तींचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

या दोन व्यक्तींना आता तालुक्यातील वडाळा महादेव येथील होमिओपॅथिक महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्ड येथे 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. गोवर्धन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात ग्रामीण भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेक गावांनी स्वतःहून लॉकडाऊन करून गावात येणारे सर्व रस्ते सील केले. परंतु गावातील नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, खबरदारी हाच उपाय असल्याने सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या