श्रीरामपूर बाजार समितीचे भाजीपाला-फळे मार्केट उद्यापासून तात्पुरते बंद
Featured

श्रीरामपूर बाजार समितीचे भाजीपाला-फळे मार्केट उद्यापासून तात्पुरते बंद

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर मार्केट यार्डमध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बाजार समितीचे भाजीपाला-फळे मार्केट उद्यापासून तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती सचिव किशोर काळे, सभापती संगीताताई शिंदे व उपसभापती नितीन भागडे यांनी दिली.

श्रीरामपूर मार्केट यार्डमध्ये इतर तालुक्यातील जिल्हा बाहेरीलही आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये गर्दी होत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्केट यार्ड साफसफाई, सॅनेटायझींग व औषध फवारणी करण्यासाठी बुधवार दि. 3 जून 2020 पासून पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तरी सर्व शेतकरी व व्यापार्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com