दरोड्याच्या तयारीतील श्रीरामपूरची टोळी पकडली
Featured

दरोड्याच्या तयारीतील श्रीरामपूरची टोळी पकडली

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- रेल्वे उड्डानण पुलाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या सहा आरोपींना दरोडा टाकण्याच्या साहित्यासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तलवार, स्क्रुड्रायव्हर, नायलॉन दोरी, मिरचीपूड व एक स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत श्रीरामपूर-नेवासा रोडवरील ओव्हरब्रीज जवळ बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास रात्रीची गस्त घालताना पोलिसांना सहा तरुण संशयास्पदरित्या फिरताना दिसले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्यापैकी अक्षय हिरामण त्रिभुवन याच्याकडे एमएच 17 सी.ए.5633 या नंबरची स्प्लेंडर मोटारसायकल व तिच्या उजव्या बाजूच्या साईड गार्ड व फुटरेस्टजवळ एक लोखंडी पाते व लाकडी मुठ असलेली धारदार तलवारवजा कत्ती, मिरची पावडर व एक नायलॉन दोरी तसेच किरण जगन्नाथ चिकणे याने पळताना एक लोखंडी धारदार व टोकदार तलवार टाकून दिली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. आकाश दिनकर सौदागरकडे मिरची पावडर व एक नायलॉन दोरी, कुर्बान ईस्माईल शेख याच्याकडे स्क्रुड्रायव्हर सापडला.

याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय चांगदेव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण जगन्नाथ चिकणे ऊर्फ बटल्या (वय 24), सागर राजू त्रिभुवन (वय 23) दोघे रा.कांदा मार्केट, पेट्रोलपंपासमोर, भिमनगर वॉर्ड नं.6, श्रीरामपूर), आकाश दिनकर सौदागर (वय 23) रा. सिद्धार्थनगर, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर), कुर्बान ईस्माईल शेख (वय 24, रा. वॉर्ड नं.2, श्रीरामपूर), अक्षय हिराचंद त्रिभुवन (वय 22, रा.गोंधवणी, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर), लहु शशिराम निकम (वय 20, वर्षे रा. जातेगांव ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com