श्रीरामपुरात दुकान फोडून बारा लाख रुपये किमतीची दारू चोरीला
Featured

श्रीरामपुरात दुकान फोडून बारा लाख रुपये किमतीची दारू चोरीला

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील नेवासारोड वरील असलेल्या नितीन वाईन्स या दारूच्या दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी विविध विदेशी कंपन्यांचा सुमारे 12 लाख 25 हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नेवासारोड वरील सगम यांच्या मालकीच्या नितीन वाईन्स या दारूच्या दुकानाच्या पाठीमागील बाजूचा लोखंडी पत्रा उचकटून, आतील सिलिंगचे सिमेंटचे पत्रे उखडून दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी उचकापाचक केली. दुकानातील विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या सुमारे 12 लाख 25 हजार 247 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी सूर्यकांत तुळशीराम सगम यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोसइ सुरवडे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com