श्रीरामपुरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन
Featured

श्रीरामपुरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन

Sarvmat Digital

मर्चंट असोसिएशनचा निर्णय

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्याची सद्य परिस्थिती आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा विचार करता 17 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय येथील मर्चंट असोसिएशनने निर्णय घेतला आहे. दुकाने उघडण्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत काल पुन्हा खासदार सदाशिव लोखडे यांच्या उपस्थितीत काल दुपारी 12 वाजता अधिकार्‍यांसोबत बैठक झाली असून त्यात आपल्या तालुक्याच्या सद्यपरिस्थिती व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा विचार करून लॉकडाऊनबाबत पूर्वीप्रमाणेच नियम ठेवण्यात आले असून सर्व व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे व आपण आतापर्यंत जो संयम दाखवला आहे तोच पुढील काही दिवस अपेक्षित आहे, असे स्पष्ट करण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत सूचनांचे सर्वांनी पालन करावे व तोपर्यंत दुकाने उघडू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष विशाल फोफ़ळे यांच्यासह उमेश अग्रवाल, निलेश ओझा, अमोल कोलते, अशोक थोरे, अशोक उपाध्ये, संजय जोशी, राजेश अलघ, सुनील गुप्ता, शेखर दुबय्या, सुधीर वायखिंडे, प्रशांत भंडारी व इतर अनेक व्यापारी हजर होते.

Deshdoot
www.deshdoot.com