श्रीगोंद्यात वादळी वार्‍यासह पाऊस
Featured

श्रीगोंद्यात वादळी वार्‍यासह पाऊस

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- एक बाजूला करोनो व्हायरस च्या भीतीने सुरू असलेल लॉक डाऊन मध्ये शेत मालाचे सुरू असलेल्या नुकसानीत तालुक्यातील बहुतांशी भागात झालेल्या वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने दुसरा झटका शेतकर्‍यांना बसला रब्बी हंगामातील बहुतांशी पिके लांबणीवर पडली असल्याने गहू, हरभरा भुईसपाट झाला तर लिंबू आणि कैर्‍या चा सडा पडला होता. कोरोनोचे संकट असल्याने शेतमाल विक्री बाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतातील कांदा काढणीला आला आहे मात्र बाजारात पाठवता येत नाही. पाठवलाच माल तर बाजारभाव कमी असल्याने फळपिके, भाजीपाला शेतात अडचण ठरत आहेत. त्यातच दिनांक 25 रोजी तालुक्यातील बहुतांशी गावात अवकाळी पावसाने आणि वादळी वार्‍यामुळे पिकांचे नुकसान झाले. गहू सपाट झाला तर हरभरा वार्‍याने उडून गेला असताना अनेक गावात झाडे पडली होती. तर घरा वरचे पत्रे उडून गेल्याचे सांगण्यात आले.

काष्टी, लिंपणगाव, आर्वी, अहमदनगर, अजनुज भागात वादळी वारे आणि पावसाने मोठे नुकसान झाले असताना पारगाव, श्रीगोंदा शहर, लोणी व्यंकनाथ पारिसरसह अन्य भागात देखील अवकाळी पावसाने नुकसान झाले असताना लिंबाचा मोठा सडा पडला होता तर आंब्याच्या झाडाचे कैर्‍या वार्‍यामुळे पडल्या होत्या.

Deshdoot
www.deshdoot.com