नेवासा शहर हॉटस्पॉट कालावधीत २७ एप्रिलपर्यंत वाढ
Featured

नेवासा शहर हॉटस्पॉट कालावधीत २७ एप्रिलपर्यंत वाढ

Sarvmat Digital

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा नगरपंचायत हद्दीत 19 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत लागू करण्यात आलेला हॉटस्पॉट कालावधी वाढवण्यात आला असून आता 27 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत हॉटस्पॉट लागू असेल. याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आदेश काढला आहे.

नेवशात कोरोनाचा दुसरा रुग्ण बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर 13 एप्रिल पासून नेवासा नगरपंचायत हद्दीत हॉटस्पॉट लागू आहे. या काळात अत्यावश्यक सेवांसाठी देखील घराबाहेर पडणे प्रतिबंधित आहे. त्याशिवाय या क्षेत्रातून कुठलीही वाहतूक करण्यास बंदी आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com