श्रीगोंदा : गोडावूनमधून चार लाखांचे कपडे चोरी
Featured

श्रीगोंदा : गोडावूनमधून चार लाखांचे कपडे चोरी

Sarvmat Digital

दोन अल्पवयीन आरोपींची चौकशी; श्रीगोंद्यातील घटना

श्रीगोंदा (ता. प्रतिनिधी) –  श्रीगोंदा येथील बगाडे कापड दुकानाच्या गोडाऊनमधून अंदाजे चार ते पाच लाख रुपयांच्या कपड्यांची चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या समाजातील काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

या मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत मुद्देमाल लपवलेले ठिकाण पोलिसांना दाखवले. त्यानुसार पोलिसांनी शहरातील साळवणदेवी रस्त्यावरील या लोकांच्या घरी जाऊन झडती घेत घरात व घरामागे लपवून ठेवलेल्या चोरीच्या कपड्यांनी भरलेल्या चार गोण्या असा 70 ते 75 हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत असणारे अमित बगाडे यांच्या कापड गोडाऊनमधून मागील दोन-तीन दिवसांपासून कपड्यांचा मुद्देमाल कमी होण्याचा प्रकार घडत होता.

त्यामुळे या कापड व्यावसायिकाने या प्रकारावर लक्ष ठेवले असता त्यांना त्यांच्या या गोडाऊनमध्ये रविवारी सकाळी काही संशयास्पद अल्पवयीन मुले आढळून आली. त्यांनी याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या संशयित अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता या कपड्याच्या गोडाऊनमधून मागील दोन दिवसांपासून कपड्यांची चोरी करत असल्याची कबुली या अल्पवयीन मुलांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी बाकीचा मुद्देमाल कुठे लपून ठेवला, याबाबत विचारणा केली असता त्यांनी साळवण देवी रस्त्यावरील त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील शेतात कपड्यांनी भरलेला मुद्देमाल लपून ठेवलयाचे पोलिसांना सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्यांनी चोरीच्या कपड्याने भरलेल्या चार गोण्या त्याठिकाणी आढळून आल्या आहेत. पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला आहे सदर चोरी ही अल्पवयीन मुलांसोबतच त्याचे कुटुंबीय व दौंड येथील काही आरोपींनी केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस दिवसभर या प्रकरणाची कसून चौकशी करत होते.

यापूर्वीही चोरी
काही दिवसांपूर्वी याच विजय चौक पारिसरात कापड दुकान, मोबाईल शॉपी, मेडिकल दुकान फोडून मुद्देमाल चोरी झाला होता. आरोपी सी.सी टीव्हीमध्ये बंधीस्त झाले होते. मात्र, अशा घटना थांबल्या नाहीत.

Deshdoot
www.deshdoot.com