नेवासा – देवगाव येथे धक्काबुक्की ; सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल
Featured

नेवासा – देवगाव येथे धक्काबुक्की ; सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल

Sarvmat Digital

नेवासा ( तालुका वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील देवगाव येथे रस्त्याच्या कामाबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याच्या रागातून सरपंचासह चौघांनी धक्काबुक्की, शिवीगाळ करून मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सरदार हसन पटेल वय ५५ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच अशोक मोहन पाडळे , काशिनाथ नाथा पाडळे, अमोल भानुदास पाडळे, मच्छिन्द्र यशवंत पाडळे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com