Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात मिळणार दररोज 4700 थाळी शिवभोजन

जिल्ह्यात मिळणार दररोज 4700 थाळी शिवभोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात करोनाचा प्रकोप वाढत असताना 28 मार्च ते 20 एप्रिल या दरम्यान शिवभोजन थाळी वाटपची संख्या 5 लाखांनी घटली आहे. यामुळे राज्य सरकारने हे घटलेले प्रमाण भरून काढण्यासाठी 23 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सुरू असणार्‍या शिवभोजन थाळी वाटपात दीड पटीने वाढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात मिळणार्‍या दररोजच्या 3 हजार 200 शिवभोजन थाळीची संख्या आता 4 हजार 700 पेक्षा अधिक राहणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडीने गरीब लोकांसाठी 10 रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केले आहे. या थाळीचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून ही थळी ही तालुका पातळीवर देखील सुरू करण्यात आली. मात्र, नगरसह राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने सरकारने नियोजित केलेल्या शिवभोजन थाळीच्या उद्दिष्टात घट आली आहे.

- Advertisement -

यात 28 मार्च ते 20 एप्रिल या दरम्यान शिवभोजन थाळी वाटपची संख्या 5 लाखांनी घट आली असल्याने ही घट भरून काढण्यासाठी 23 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सुरू असणार्‍या शिवभोजन थाळी वाटपात दीड पटीने वाढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात आता 4 हजार 700 पेक्षा अधिक शिवभोजन थाळी मिळणार आहे. दरम्यान, सरकारच्या सुचनेनूसार ज्यांच्याकडे दहा रुपये देखील नाहीत, अशा व्यक्तींना शिवभोजन थाळी देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानूसार त्यांचे पालर्स स्वरूपात वितरण सुरू आहे.

सध्या सुरू असणारे वितरण थाळीनिहाय
बळीराजा हॉटेल 253, हॉटेल दत्ता 202, हमाल पंचायत 250, हर्षवर्धन केटरिंग 157, आवळा पॅलेस 206, संस्कृती हॉटेल, रेव्हूनी कॉटिंग 200, हॉटेल सद्गुरूकृपा 157, सुवर्णम प्राईड 386, हॉटेल वुड लॅण्ड पारनेर 87, कृष्णा भोजनालय 364, हॉटेल समर्थ अकोले 129, स्वामी समर्थ हॉटेल 185, हॉटेल श्रीकृष्ण कर्जत 151, तिवारी हॉटेल 187 आणि तृप्ती भोजनालय 73 असे आहेत. या ठिकाणी आता दीड पट संख्याने शिवभोजन थळी मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या