शिर्डी : 30 हजार रुपये दंड व शारीरिक कवायतीची शिक्षा
Featured

शिर्डी : 30 हजार रुपये दंड व शारीरिक कवायतीची शिक्षा

Sarvmat Digital

विनाकारण बाहेर पडणार्‍या व्यक्तींवर शिर्डीत कारवाई

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – राहाता तालुका करोनामुक्त झाल्याची घोषणा तहसीलदार यांनी करतांंच त्याचा परिणाम शिर्डीतील जनतेवर झाल्याचे दिसून आले. परिणामी दुसर्‍या दिवशी गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍यांची संख्या वाढली. शिर्डीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या अशा 10 महिलांसह 70 जणांवर कारवाई करण्यात आली. सर्वांना शिक्षा म्हणून शारीरिक कवायत करणे भाग पाडण्यात आले तसेच दंडात्मक कारवाईही करण्यात आली. विनाकारण फिरणार्‍या दहा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलून 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून दीड तास शारीरिक कवायत करण्यास लावून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या.

सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, शिर्डी पोलीस कर्मचारी, नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी, यांचे विशिष्ट पथक तयार करून गुरुवारी सकाळी सहा वाजता द्वारावती सर्कल या ठिकाणी बंदोबस्त लावला. यावेळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या 70 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात 10 महिलांचाही समावेश आहे. 20 जणांवर शिर्डी पोलिसांनी प्रत्येकी 200 रुपये दंड केला तर शिर्डी नागरपंचायतीच्यावतीने 35 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com