हैद्राबाद-शिर्डी या इंडिगो विमानातून 43 प्रवाशांचे शिर्डी विमानतळावर आगमन
Featured

हैद्राबाद-शिर्डी या इंडिगो विमानातून 43 प्रवाशांचे शिर्डी विमानतळावर आगमन

Sarvmat Digital

प्रवाशांना सॅनिटायझर पुरविण्यात येवून सामानाचे केले निर्जंतुकीकरण

शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डी विमानतळावर काल सायंकाळी पावणेसहा वाजता इंडिगो कंपनीची 75 आसनी हैद्राबाद ते शिर्डी हे विमान दाखल झाले. या विमानातून एकूण 43 प्रवाशी उतरले असून यात दोन बालकांचाही समावेश आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील 18 प्रवाशांचा समावेश होता. यावेळी प्रवाशांना सॅनिटायझर पुरविण्यात आले असून प्रवाशांकडील सामनाचे निर्जतुकीकरण करण्यात आले.

नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील तसेच राहाता व परिसरातील वास्तव्य करणारे हे प्रवासी लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडले होते. काल इंडिगो कंपनीच्या हैद्राबाद ते शिर्डी या विमानाचे आगमन झाले. त्यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या विमानातून आलेल्या प्रवाशांची विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली आव्हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बडदे, विमानतळ वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्वी शिंदे, आरोग्य सेवक दिपक एकबोटे,आरोग्य सेविका अंजुम पठाण यांच्या पथकाने प्रवाशांची आगमनावेळी वैद्यकीय तपासणी केली. आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, सहाय्यक शिक्षक सजन पोकळे, राजू सोनवणे यांनी सहकार्य केले.

यावेळी सर्व प्रवाशांना सॅनिटायझर पुरविण्यात आले. तसेच त्यांच्या बॅगा व इतर सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा, सी.आय.एस.एफ.डेप्युटी कमांडर दिनेश दहिवाडकर आदी उपस्थित होते. हे विमान हैद्राबादकडे रवाना झाले. यात एकूण 28 प्रवासी होते.

Deshdoot
www.deshdoot.com