24 लाखांचा अवैध मद्यसाठा पकडला
Featured

24 लाखांचा अवैध मद्यसाठा पकडला

Sarvmat Digital

राज्य उत्पादन शुल्कची शिर्डीजवळील निमगाव कोर्‍हाळे येथे कारवाई

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी जवळील निमगाव कोर्‍हाळे ग्रामपंचायत हद्दीत नगर-मनमाड महामार्गावरील बियर व वाईन शॉपीच्या पाठीमागील बाजूस असलेेल्या गोदामात 24 लाख 39 हजार रुपये किमतीचा अवैध बियर व वाईनचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला. ही कारवाई करण्यात आली
निमगाव येथील आनंद बियर व वाईन शॉपीवर सोमवारी सायंकाळी छापा टाकून सुमारे 24 लाख 39 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाईन शॉपचे मालक योगेश नंदकुमार कडलग रा. निमगाव कोर्‍हाळे यांना अटक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना संपूर्ण जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत मद्य विक्री दुकाने बंद ठेेेेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेेेेश असतानाही शिर्डी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निमगाव कोर्‍हाळे शिवारात योगेश नंदकुमार कडलग यांच्या मालकीच्या आनंद बियर व वाईन शॉपी नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्रा शेड गोदामात अवैधरित्या नामांकीत 17 विविध कंपन्यांच्या बिअर व वाईनचा मोठ्या प्रमाणात विक्री करता साठा करून ठेवला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली.

गोदामावर जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक प्रमोद नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सराफ, अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक अजित बडधे यांच्यासह पथकाने या गोदामावर छापा टाकून हा अवैध बियर व वाईनचा साठा जप्त केला.

मुकेश मुजमुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी योगेश नंदकुमार कडलग यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास दुुुय्यम निरीक्षक अजित बडधेे करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com