Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळ : चार येणारी व चार जाणारी विमाने रद्द

शिर्डी विमानतळ : चार येणारी व चार जाणारी विमाने रद्द

सकाळी हैदराबादवरून आले अवघे दोनच प्रवासी, शिर्डीवरून 31 तारखेपर्यंत एअर इंडियाची विमानसेवा राहणार बंद

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक जण फिरणे टाळत असल्याने काकडीच्या शिर्डी विमानतळावर मंगळवार व बुधवारी या दोन दिवसांत येणारे चार व जाणारे चार असे आठ विमाने रद्द झाली आहेत. एअर इंडियाने 31 मार्चपर्यंत शिर्डी विमानतळावरची उड्डाणे रद्द केली आहेत. हैदराबाद वरून आज स्पाईसजेटच्या विमानात अवघे दोनच प्रवासी आले.

- Advertisement -

या विमानतळावरुन स्पाईसजेटचे दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू येणारे व जाणारे तसेच एअर इंडियाचे मुंबईचे येणारी व जाणारी विमाने मंगळवार व बुधवारी रद्द झाली आहेत. बुधवारपासून एअर इंडियाने 31 मार्चपर्यंत शिर्डी विमानतळावरची उड्डाणे रद्द केली आहेत. जी विमाने सुरु आहेत त्यातही अतिशय कमी प्रवासी प्रवास करत आहेत. येणार्‍या प्रवाशांची संख्या फारच कमी आहे.

तुलनेने जाणारे प्रवासी जास्त आहेत. साईबांबाचे मंदिर दर्शनासाठी बंद केल्यामुळे येणारी संख्या कमी झाली आहे. प्रवासी संख्या कमी झाली तर अजूनही काही विमाने रद्द होणार आहेत. बुधवारी येणार्‍या प्रवाशांची संख्या 26, 2, 19, 30, 11 अशी दोनच अंकी होती तर जाणारे प्रवाशांची संख्या 125, 33, 32, 85, 21 अशी होती. एअर इंडियाचे सहा तर स्पाईसजेटचे पाच अशी 11 उड्डाणे बुधवारी झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या