शेवगावला बारावीच्या पाच कॉपी बहादरांना पथकाने पकडले
Featured

शेवगावला बारावीच्या पाच कॉपी बहादरांना पथकाने पकडले

Sarvmat Digital

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी ) – बारावीच्या सुरु असलेल्या परीक्षेमध्ये भरारी पथकाने केलेल्या कारवाईत शेवगाव येथील दोन केंद्रावर पाच विद्यार्थी कॉपी करताना पकडल्यानंतर त्यांच्यावर कॉपी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तालुक्यासह शहरातील सर्व 11 केंद्रावर बारावीच्या परीक्षा सुरु आहेत.

शनिवारी हिंदी विषयाचा पेपर सुरु असताना तालुकास्तरीय भरारी पथकाने भेट दिली असता शहरातील न्यू आर्टस महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर तीन व रेसिडेन्शिअल हायस्कुल केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. त्यांच्यावर कॉपी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखालील शेवगावच्या पथकाने ही कारवाई केली. यामुळे पुढील विषयाच्या परीक्षेसााठी कॉपी बहादरांना चाप बसणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com