आ.पाचपुतेंनी सरकारवर टीका करण्याअगोदर स्वतः आत्मपरीक्षण करावं – घनःशाम शेलार

आ.पाचपुतेंनी सरकारवर टीका करण्याअगोदर स्वतः आत्मपरीक्षण करावं – घनःशाम शेलार

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असताना काल आ. बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून जनतेला वा-यावर सोडले आहे, अशी टीका केली. ही टीका निरर्थक असून अशी टीका करण्याअगोदर या अत्यंत अडचणीच्या कालखंडात आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केलं याच आत्मपरीक्षण करावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी दिला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असून विकसित देश देखील या भयंकर संकटाने हतबल झाले आहेत ही कठीण परिस्थिती राज्यातील मा.ना. उध्दवजी ठाकरे साहेब यांचे नेतृत्वातील सरकार अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने परिश्रम पुर्वक हाताळत असून देशाचे नेते शरदचंद्र पवार या वयात या अडचणीतून राज्याला व देशाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , गृहमंत्री अनिल देशमुख  व सर्वच मंत्री अहोरात्र या भयंकर संकटावर मात करण्यासाठी कष्ट घेताहेत हे राज्यातील जनता पहात असून सरकारचे जनतेकडूने वेळोवेळी कौतुकही झाले आहे तर उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी देखील महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे एवढं चांगले काम सरकार करत असताना आ.पाचपुते सरकारवर टीका करत आहेत, खरतर ही वेळ राजकारण करण्याची नसून या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असताना यांना मात्र राजकारण सुचतंय, खरंतर तुम्ही केवळ शिवसैनिकांच्या मतांमुळे आमदार झालात त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com