सावेडीत चोरांकडून पोलिसांना नववर्षाची सलामी; धाडसी चोरी
Featured

सावेडीत चोरांकडून पोलिसांना नववर्षाची सलामी; धाडसी चोरी

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) –  सावेडीतील गावडे मळ्यात धाडसी झालेल्या चोरीत सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पोलिसांन चोरांनी नववर्षाची सलामी देत धाडसी चोरी केली. अमित बुरा (वय- 43 रा. गावडे मळा, सावेडी) यांच्या घरात ही चोरी झाली. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुरा गावडे मळ्यातील राहते घर बंद करून कुटुंबासमवेत सोमवारी (दि. 30) सकाळी पुणे येथे नातेवाईकांकडे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून सोमवारी रात्री किचनचा दरवाजा तोडला. घरात असलेली 42 हजार रुपयांची रोख रक्कम व पावणे सात लाखांचे सोन्याचे दागिने असा सव्वा सात लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीचा प्रकार मंगळवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आला. मंगळवारी सायंकाळी तोफखाना पोलीस व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

घरातील चावीच्या वासाने रक्षा नावाच्या श्वानाने पिंपळगाव माळवी फाट्यापर्यंत माग काढला. तेथून पुढे चोरांनी वाहनांचा वापर केला असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com