नगर: सावेडीत पोलिसांची नाकाबंदी

नगर: सावेडीत पोलिसांची नाकाबंदी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील धूम स्टाईल गंठण चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांनी आज मंगळवारी सावेडीत नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान विना नंबरच्या मोटारसायकलस्वाराने पोलिसांसोबत हुज्जत घातली. नगर शहरासह उपनगरात धूमखोरांनी हैदोस घातला आहे. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईलने लंपास करण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित झाल्याने आज पोलिसांनी सावेडीच्या पारिजात चौकात नाकाबंदी मोहीम राबविली.

या मोहिमेदरम्यान धूमखोरीच्या संशयातून प्रत्येक मोटारसायकलस्वरांकडे चौकशी करून कागदपत्र तपासणी सुरू होती. याच दरम्यान एक विना नंबरची मोटारसायकल तपासणी दरम्यान पोलिसांना दिसली. त्या तरुणाकडे चौकशी केल्यानंतर त्याचे अरेरावी करत पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस तेथे पोहचले. कारवाई करावी किंवा कसे याबाबतचा निर्णय दुपारपर्यंत झाला नव्हता. पोलिसांच्या माहितीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. तर काहींनी गुन्हा दाखल होणार नाही असे सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com