ससाणेंना ताकद द्या; समर्थकांचे ना. थोरातांना साकडे
Featured

ससाणेंना ताकद द्या; समर्थकांचे ना. थोरातांना साकडे

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- ससाणे गटाच्या काँग्रेसच्या नगरसेवकांसह काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी शनिवारी रात्री 11 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बंद खोलीत चर्चा केली. या बैठकीत उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना ताकद द्या, असे साकडे ससाणे समर्थकांनी घातले.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी ना. थोरात यांनी संजय छल्लारे यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी श्रीरामपुरात ससाणे गटाविरोधात काँग्रेसचा दुसरा गट कार्यरत आहे. त्यामुळे ससाणे गटाची कोणतीही विकास कामे होत नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या दुसर्‍या गटाने पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम करून ससाणे गटाला एकाकी टाकण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या राजकारणातही हा गट आदिक गटासोबत आहे.

पालिकेत तसेच इतर सत्ता नसलेले ससाणे गटाच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामे रखडली आहे. त्यासाठी निधी द्यावा तसेच करण ससाणे यांना पक्षाचे पद देऊन ताकद द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी आ. लहु कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, मुळा प्रवराचे व्हा. चेअरमन जी.के. बकाल पाटील, अनिल कांबळे, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यासह ससाणे गटाचे काँग्रेसचे नगरसेवक मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी, गटनेते संजय फंड, दिलीप नागरे, मनोज लबडे, सुहास परदेशी, रितेश रोटे, शशांक रासकर उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com