‘सार्वमत’ आयोजित श्रीरामपूर शॉपिंग महोत्सवाची जोरदार तयारी
Featured

‘सार्वमत’ आयोजित श्रीरामपूर शॉपिंग महोत्सवाची जोरदार तयारी

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– दै. सार्वमत आयोजित श्रीरामपूर शॉपिंग महोत्सव 2020’ दि. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालवधीत होत आहे. महोत्सवात खरेदीसोबत मनोरंजनाचा खजिना आणि खव्वैयेगिरीचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. थत्ते मैदानावर या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा महोत्सव ग्राहकांसाठी खुला असणार आहे.

श्रीरामपूरमध्ये दैनिक सार्वमत प्रथमच श्रीरामपूर शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करत असून यामध्ये अगदी छोट्या वस्तूंपासून मोठ्या टू-व्हिलर, फोर व्हिलर गाड्या तसेच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. याबरोबरच विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम व स्पर्धाही होणार आहेत.

श्रीरामपूर शॉपिंग महोत्सवामध्ये गॅस स्टोव्ह, फिटनेस साहित्य, पेस्ट कंट्रोल, नागली फिंगर्स, पॉपकॉर्न मेकर, फर्निचर, पिकनिक टेबल, हॉट बॅग, शिलाई मशिन, चप्पल, बुट, नमकीन, विविध प्रकारचे साबण, रोटी मेकर, खादी शर्ट, कॉटन शॉक्स, विविध प्रकारचे औषधे, टू-व्हिलर, फोर व्हिलर, गॅस जाळी, विविध प्रकारचे मसाले, किचन वेअर, हळदी प्रॉडक्टस्, प्लॉट व फ्लॅट, चिक्की व गुळपट्टी, हर्बल, ट्रॅक्टर, जवस, हिंगोळी, मॅजिक बुक, मणुके, लेग मसाजर्स, ऑईल मेकिंग मशिन, नोट काउंटींग मशीन, ग्लास क्लिनर, धूप स्टँड, नागली पापड, फॅन्स, खुर्च्या, खाकरा, सोयास्टिक, उडीद पापड, कुर्डई, चुर्णमुखवास, बल्ब, सेव्हर, भेंडी कटर, स्लाईसर, ज्युसर, आयमास्क, आयुवेर्दीक औषधे, मिल्क शेक पावडर, कॉटन सारीज, खानदेशी उडीद पापड, हेअर ड्रायर, वेदनाशामक ऑईल, गुलाबजल, जडीबुटी, कॉस्मेटीक्स, आटामेकर, हँगिग झुला आदी वस्तूंबरोबरच भरीत भाकरी, पुरणपोळी मांडे, फ्रुट चाट, शेगाव कचोरी, दिल्ली पापड, मसाला पान, वडापाव, दाबेली, धपाटे, पाणीपुरी यासह विविध प्रकारचे खाद्यप्रदार्थ ग्राहकांना याठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

गुरूवारी सोलो डान्स, शुक्रवारी ग्रुप डान्स
27 फे्रबुवारी रोजी खुली ‘सोलो डान्स’ स्पर्धा होणार आहे. तर 28 फेब्रुवारी रोजी ‘ग्रुप डान्स स्पर्धा’ होणार आहे. विजेत्या प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांकासाठी आकर्षक रोख बक्षीसे आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धेसाठी नावनोंदणी विनाशुल्क असून इच्छुक स्पर्धक व डान्स ग्रुपने दैनिक सार्वमत कार्यालयात अधिक माहितीसाठी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रंग लावण्यांचे…
29 फेब्रुवारी रोजी ‘आर्केस्ट्रा बॉलीवूड धमाका’ तर 1 मार्च रोजी ‘रंग लावण्यांचे’ हा बहारदार लावणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांसाठी सर्वांना खुला प्रवेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com