वाहन उद्योग पुन्हा वेग घेणार !

वाहन उद्योग पुन्हा वेग घेणार !

विक्री क्षेत्रातील मान्यवरांचा आशावाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील अर्थव्यवस्थेला गती देणारा वाहन उद्योग आगामी काळात संकटांवर मात करून पुन्हा वेग घेईल, असा विश्वास वाहन विक्री क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला.

सार्वमत संवाद कट्टा या संवाद उपक्रमात ‘करोनानंतरचा वाहन उद्योग’ या विषयावरील चर्चेत यश ऑटोमोबाईलचे संचालक योगेश गाडे, छत्रपती ऑटोमोबाईलचे संचालक अनुज मित्तल व भन्साळी ऑटोमोबाईलतर्फे तृप्ती कोंडा यांनी सहभाग घेतला. करोनाआधीच गेल्या वर्षभरापासून वाहन उद्योग अडचणीत होता, याकडे श्री.मित्तल यांनी लक्ष वेधले. आगामी काळात नव्या सुधारणांसह हा उद्योग वेग पकडेल, असे श्री.गाडे म्हणाले.

नगर जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. यंदा हंगाम चांगला राहील, त्याचा सकारात्मक परिणाम वाहनविक्रीवरही दिसेल. साधारणत: गणेशोत्सवापासून दिवाळीच्या काळात यंदा वाहन उद्योग पुन्हा एकदा वेग पकडेल. बँकांच्या कर्जधोरणात वाहन कर्जासाठी वेगळा विचार करण्याची अपेक्षा आहे. त्याचा फायदा होईल.

– योगेश गाडे

वाहन उद्योग वर्षभरापासून संकटांचा सामना करत आहे. धोरण बदलांपासून नव्या सुधारचा अशा अनेक बाबी त्यास कारणीभूत ठरल्या. बदल स्वीकारताना असे घडतेच. त्यात करोना आला. मात्र आगामी काळात ग्राहक, वाहन निर्माता आणि सरकार अशा पातळ्यांवर सकारात्मक मानसिकतेच्या जोरावर निश्चितच बदल घडतील.

-अनुज मित्तल

सध्या येणार्‍या ग्राहकांमध्ये गाड्या घेणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही विक्री तुरळक आहे. मात्र ही स्थिती बदलेल. पुढील काळात वाहनांकडे ग्राहकांचा कल पुन्हा वाढेल.

– तृप्ती कोंडा

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com