सदाबहार गाणी अन् दिलखेचक नृत्याने उत्साहाला बहर
Featured

सदाबहार गाणी अन् दिलखेचक नृत्याने उत्साहाला बहर

Sarvmat Digital

थत्ते मैदान हाऊसफुल्ल; ‘सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020’ चा आज शेवटचा दिवस

आज रंगणार… रंग लावण्यांचे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- ‘सार्वतम शॉपिंग एक्स्पो 2020’ निमित्त आयोजित सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर मनोरंजनाच्या मेजवानीत स्वरझंकार प्रस्तुत ऑकेस्ट्राने सादर केलेल्या बहारदार मराठी-हिंदी गाणी व दिलखेचक नृत्याने या महोत्सवाच्या उत्साहात अधिक भर घातली.

या शॉपिंग महोत्सवाचा आज रविवार शेवटचा दिवस आहे. बक्षिस वितरणापूर्वी सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 चे प्रमुख प्रोयोजक समता मल्टीस्टेटचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सह प्रोयोजक साई आदर्श मल्टी स्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, डी.एम. मुळे चष्मावालाचे अभिजित मुळे, श्री इन्पॅक्स फर्निचरचे विजय कुदळे यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वरील मान्यवरांसह उपनगराध्यक्ष करण ससाणे, बाजार समितीचे माजी सभासपती सचिन गुजर, महर्षि नागरीचे व्यवस्थापक दंडवते, दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, व्यवस्थसापक महेश गिते यांच्या उपस्थित सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक विजय ढोले, अर्चना आहेर, याज्ञी कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

सार्वमत शॉपिंग एक्स्पोचा कालचा तिसरा दिवस होता.या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या व्यावसायिकांनी थाटलेल्या स्टॉलवर ग्राहकांनी अलोट गर्दी केली होती. रोटी मेकेर, ज्युसर, हॅड शिलाई मशिन, फर्निचर, फोल्डींग टेबल, आयुर्वेदिक औषधे, पापड, कपडे, सौदर्यप्रसादने, कार, ट्रक्टर, टेम्पो, मोटारसायकल या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली.

स्पर्धेतील विजेते : सोलो डान्स- प्रथम क्रमांक सोहम साळुंके, द्वितीय रितिषा लबडे, तृतीय क्रमांक विभागून समृध्दी दळवी व तनिष्का डक.
गु्रप डान्स- प्रथम क्रमांक डी. जे. बॉईज गु्रप, द्वितीय क्रमांक विभागून- आर. डी. ए. गु्रप व स्नेहमाला डान्स अ‍ॅकॅडमी. तृतीय क्रमांक गौरव थोरात व गौतम पवार. उत्तेजनार्थ विभागून – कै. अनिल दिगंबर मुळे शाळा व न.पा. शाळा क्र. 6.

भाग्यवान ग्राहक
29 फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्य भाग्यवान ग्राहक – जियान बागवान, शोभा पवार, पंकज गोहिल, आर.ए. भालदंड, सौ. रेवती भरत मुळे, शुभांगी सातपुते, जानवी मनोज शिकरे, दिपाली जितेंद्र थापर, आनंद विष्णू फुणगे, स्नेहल निकुंभ

श्रीरामपुरातील उद्योजकांना एक वेगळे व्यासपीठ मिळाले. श्रीरामपूरकरांना यातून खरेदीची संधी मिळाली. पहिले वर्ष असूनही सार्वमत टिमने सुंदर नियोजन केले. – कडुभाऊ काळे, नागेबाबा मल्टीस्टेट

या कार्यक्रमातून एक वेगळा अनुभव अनुभवायास मिळाला. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन झाले. त्यामुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. – अनिल कासार, समता नागरी पतसंस्था

सार्वमत शॉपिंग एक्स्पोला एकच नंबर प्रतिसाद मिळाला. शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. – प्रसाद कुलकर्णी, मुळे मोटर्स

दै. सार्वमतने आयोजित केलेला सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 चे नियोजन अप्रतिम आहे. या एक्स्पो मध्ये सहभागी झालेले स्टॉलधारक व त्यांनी आणलेल्या वेगवेगळ्या वस्तूही श्रीरामपूरकरांना पर्वणी ठरली. – अविनाथ कुदळे, श्री इम्पेक्स

बालगोपालांपासून अबालवृध्दांना सुखावणारा असा कार्यक्रम तसेच आनंददायी सांस्कृतिक आणि खवय्यांना मनमुराद मेजवाणी यामधून घेता आली. – सौ. धनश्री औताडे, श्रीरामपूर

श्रीरामपूर सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2020 हा एक चांगला उपक्रम राबविला आहे. त्यात सर्व गोष्टी एकच छताखाली पहावयास मिळाल्यामुळे दै. सार्वमतला धन्यवाद.- अनिल भडके, श्रीरामपूर

Deshdoot
www.deshdoot.com