संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी दिंडी सोहळा यावर्षी रद्द
Featured

संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी दिंडी सोहळा यावर्षी रद्द

Sarvmat Digital

नेवासा बु. (वार्ताहर) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील नेवासा ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली .

तसेच यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना चंद्रभागा नदीत अभिषेक घालणार असल्याची माहिती देखील या वेळी दिली संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते गुरुवर्य ब्रम्हलिन बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या या दिंडीला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्ञानेश्वरीच्या रचनास्थान असलेल्या या दिंडीचे महत्व पंढरपूरमध्ये मोठे आहे.

मात्र कोरोनाचे संकट अजून ही देशात व महाराष्ट्रात असल्याने शासन निर्णय देखील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असल्याने त्या निर्णयाचा मान ठेऊन व राष्ट्रीय कर्तव्य समजून यंदाची आषाढी वारी दिंडी रद्द करण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानने घेतला असल्याने कोणीही दिंडीसाठी मंदिरात येऊ नये असे आवाहन हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्यासह संस्थानच्या विश्वस्त मंडळाने वारकरी भक्तांना केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com