रोड रोमिओला मुलींसमोरच काढायला लावल्या उठाबशा
Featured

रोड रोमिओला मुलींसमोरच काढायला लावल्या उठाबशा

Sarvmat Digital

रोड रोमिओला मुलींसमोरच काढायला लावल्या उठाबशा

संगमनेर (प्रतिनिधी)- येथील बसस्थानकात महाविद्यालयीन युवतीची छेड काढण्याचा प्रयत्न करणार्‍या महाविद्यालयीन तरुणाची रोमिओगिरी एका होमगार्ड महिलेने मोडित काढत, या तरुणाला बसस्थानकात मुली आणि प्रवाश्यांसमोर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संगमनेर बसस्थानक परिसरात होणारी चोरी व रोड रोमिओकडून होणारी मुलींची छेड रोखण्यासाठी शहर पोलिसांनी बसस्थानकावर दोन महिला व एक पुरुष होमगार्डची नेमणूक केली आहे. बस स्थानकातील उपहार गृहामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढताना एका तरुणाला महिला होमगार्डने ताकीद देऊन मागील आठवड्यात सोडून दिले होते. बुधवारी 8 जानेवारी दुपारी पुन्हा त्या युवकाने बस्थानकामध्ये काही विद्यार्थिनीची छेड काढली. यावेळी महिला होमगार्डने त्या रोमिओला पकडून बसस्थानकात मुली आणि प्रवाश्यांसमोरच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या सर्व प्रकाराने संबंधित रोडरोमियोला चांगलीच अद्दल घडविली.

Deshdoot
www.deshdoot.com