Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरसंगमनेरच्या कांदा व्यापार्‍याची उत्तर प्रदेशच्या व्यापार्‍यांकडून फसवणूक

संगमनेरच्या कांदा व्यापार्‍याची उत्तर प्रदेशच्या व्यापार्‍यांकडून फसवणूक

संगमनेर (प्रतिनिधी)- कांदा खरेदी करून त्यापोटी खरेदीदाराने दिलेला धनादेश ब्लॉक ठेवून कांदा मालकाची एक कोटी 33 लाख 66 हजार 803 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उत्तर प्रदेशातील दोघा व्यापार्‍यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर दगडू सातपुते (रा. खांजापूर, सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याकडून 25 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2020 दरम्यान अमन राजपूत व मनमोहन राजपूत ललाई (रा. पोस्ट खैरगड, फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) यांनी एक कोटी 33 लाख 66 हजार 803 रुपयांचा कांदा खरेदी केला. सदर कांदा हा सातपुते यांनी सदर दोन्ही व्यापार्‍यांना ट्रान्सफरने पाठविला. त्याबदल्यात सदर दोन्ही व्यापार्‍यांनी सातपुते यांना धनादेश दिला होता.

- Advertisement -

मात्र सदर कांद्याचे पैसे मागण्याकरीता सातपुते यांनी वारंवार राजपूत व ललाई यांना वारंवार फोन केले. मात्र त्यांनी फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे सातपुते यांना सदर व्यापार्‍यांनी ब्लॉक धनादेश देवून आपली फसवणूक झाली आहे, याची खात्री झाली. त्यानुसार मनोहर सातपुते यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अमन राजपूत व मनमोहन राजपूत ललई यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी सदर दोन्ही व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 94/2020 भारतीय दंड संहिता 420, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. माळी हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या