संगमनेरने गाठला 52 चा आकडा
Featured

संगमनेरने गाठला 52 चा आकडा

Sarvmat Digital

तीन महिलांसह अडीच वर्षीय मुलगा बाधित

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर शहरासह तालुक्यातील करोना बाधीतांची संख्या 52 झाली आहे. त्यापैकी उपचार सुरु असलेले 25 आहेत. तर संगमनेर शहरातील एकूण 26 बाधीत असून उपचार सुरु असलेले 13 रुग्ण आहेत. काल मंगळवारी डिग्रस येथील यापूर्वी करोना बाधीत आढळलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 21 व 45 वय असलेल्या दोन महिलांचा स्वॅब अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे, तर मोमीनपुरा येथील एका 36 वर्षीय महिला व अडीच वर्षीय मुलाचा असे काल चार नव्या रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

तर मुळचे संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील रहिवाशी आणि सध्या नाशिक पोलीस दलात सेवेत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर पोलीस कर्मचारी नाशिक येथेच आहे.करोना बाधीतांची संख्या गेल्या आठवड्यात झपाट्याने पुढे येत आहे. संगमनेर शहरासह तालुक्यातील 10 गावांमध्ये करोना रुग्ण आढळून आले आहे. मंगळापूरचे मुळ रहिवाशी असलेल्या पोलीस कर्मचार्‍याचे काही दिवस मंगळापूरमध्ये वास्तव्य होते अशी माहिती पुढे आल्याने त्याच्या संपर्कातील सहा व्यक्तींना प्रशासनाने ताब्यात घेत पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तर बाधीत पोलीस कर्मचारी नाशिक येथे उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

काल मंगळवारी नव्याने 4 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधीतांच्या संख्येने 52 चा आकडा गाठला. तिन दिवसापूर्वी तालुक्यातील डिग्रस येथे मुंबईहून आलेल्या 52 वर्षीय महिला करोना बाधीत आढळून आली होती. सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन महिलांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या दोनही महिलांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुर आहे. रात्री उशीरा शहरातील मोमीनपुरा येथील एका 36 वर्षीय व अडीच वर्षीय मुलाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

करोना बाधितांची संख्या 19

अकोलेकरांची डोकेदुखी वाढली

अकोले (प्रतिनिधी)– अकोले तालुक्यातील जांभळे आणि वाघापूर येथील करोना रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येकी तीन अशा सहा रुग्णाचे अहवाल आज मंगळवारी दुपारी तर रात्री बोरी येथील बाधिताच्यासंपर्कात आलेल्या एका 60 वर्षीय महिलेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आले असून तालुक्यातील रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे.

हे सर्व रुग्ण मुंबई परिसरातून आपापल्या मूळ गावी आलेले आहेत. तालुक्यातील एकही स्थानिक व्यक्तीला मात्र अद्याप करोनाची बाधा झालेली नाही. तालुक्यात घाटकोपर मुंबईवरून जांभळे येथे आलेल्या पॅाझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 48 व 24 वर्षीय दोन महिला व 28 वर्षीय पुरुष असे तीन व वाघापूर येथे मुंबईवरून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील 32 व 40 वर्षीय दोन महिला व 45 वर्षीय पुरुष असे तीन रुग्ण मिळून तालुक्यातील 6 रुग्णांचा करोना अहवाल आज पॅाझिटिव्ह आला असून तालुक्यात रुग्णांची संख्या 19 झाली आहे .

अकोले तालुक्यात प्रशासनाच्या कडेकोट नियोजनामुळे सुरूवातीला करोनाच्या तिसर्‍या टप्प्यापर्यंत तालुक्यात करोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. परंतु तिसर्‍या लॅाकडाऊननंतर तालुक्यात मुंबईवरून मोठ्या प्रमाणात लोक येऊ लागले. तिसर्‍या लॅाकडाऊननंतर चौथ्या लॅाकडाऊनमध्ये जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक लोक बाहेरगावातून अकोले तालुक्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या बाहेरून विशेषतः मुंबईतून येणार्‍या लोकांच्या माध्यमातून तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला.

लिंगदेव येथे आलेले शिक्षक, ढोकरी येथील अभियंता, समशेरपूर, पिंपळगाव खांड, धामणगाव पाट, जांभळे, बोरी(कोतूळ),वाघापूर अशा तालुक्यातील खेडोपाडी आलेल्या मुंबईकरांना करोना झाल्याचा अहवाल आला. तालुक्यात सध्या एकूण 19 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी लिंगदेव व समशेरपूूर येथील रुग्ण उपचार होऊन करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाची सध्या तारेवरची कसरत सुरू आहे.तालुक्यात आतापर्यंत 19 रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com