वाळुतस्करांची पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की
Featured

वाळुतस्करांची पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

Sarvmat Digital

पोलिसांच्या ताब्यातील वाळूतस्करांनी ट्रॅक्टर नेला पळुन 

जामखेड (तालुका प्रतिनिधी)-  जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात पेट्रोलींग करत असताना वाळुचा पकडलेला ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला घेऊन चल असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. तसेच मी गावचा पाटील आहे असे म्हणुन आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी करुन पोलीसांच्या ताब्यातील ट्रॅक्टर  पळवून नेला. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल गोकुळ लेंडवे व बबलु प्रकाश जाधव. रा. तरडगाव ता. करमाळा. जिल्हा. सोलापूर अशी दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी विठ्ठल बाबुराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आम्ही दि ३१ मार्च रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करताना आरोपी विशाल गोकुळ लेंडवे हा जामखेड तालुक्यातील जवळा गावच्या शिवारात नांदनी नदीच्या जवळ हा त्याच्याकडील वाळुने भरलेला ट्रॅक्टर गाण्याचा मोठा अवाज करून चालला होता.
या वेळी फीर्यादी यांनी त्याला थांबून तु ट्रॅक्टर मधिल गाण्याचा आवाज मोठा करुन कोठे चालला व ट्रॅक्टर मध्ये काय आहे आसे विचारले असता त्याने ट्रॅक्टर मध्ये वाळु आहे असे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी त्यास ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला घेऊन चल आसे सांगितले.
यावेळी फिर्यादीची गंचाडी धरून धक्काबुक्की करून फिर्यादीच्या हातातील ट्रॅक्टरची चावी हिसकावून घेतली व ती ड्रायव्हरला देऊन तु ट्रॅक्टर परत घेऊन जा मी यांच्याकडे पाहतो असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करून ट्राॅलीसह ट्रॅक्टर सदर ठिकाणावरून पळवून नेला. त्यामुळे फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी वरील दोन आरोपींन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.
Deshdoot
www.deshdoot.com