हरहुन्नरी वाजीदची सुपरहिट वाटचाल
Featured

हरहुन्नरी वाजीदची सुपरहिट वाटचाल

Sarvmat Digital

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता आणि दोन वर्षांपूर्वीच प्रत्यारोपण करण्यात आले होते.

साजिद – वाजिद ही जोडी १९९८ मध्ये प्रकाशझोतात आली. त्यावर्षी त्यांनी सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले. त्यानंतर १९९९ साली सोनू निगमच्या ‘दिवाना’ या अल्बमला त्यांनी संगीत दिले. तसेच त्याच वर्षी त्यांनी ‘हट्टा सावन की घटा’, ‘चुपके से कोई और’ व ‘हॅलो ब्रदर’ सारखे गाणे लिहलेत.

साजिद – वाजिद या जोडीने सलमान खानच्या अनेक सुपरहिट चित्रपटाना संगीत दिले आहे. त्यात ‘तेरे नाम’, ‘गर्व’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘पार्टनर’, ‘वॉन्टेड’, ‘वीर’, ‘दबंग’, ‘नो प्रोब्लेम’ व ‘एक था टायगर’ या चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.

तसेच या जोडीने टीव्ही वरील अनेक आघाडीच्या अनेक कार्यक्रमासाठी शीर्षक गीते बनवली आहे. त्यात ‘सारेगमपा २०१२’ ‘बिग बॉस ४ व ६’ तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या चौथ्या सिझनचे गाणे वाजिद खान यांनी गायले होते.

Deshdoot
www.deshdoot.com