Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डी – साईबाबा संस्थांनने अन्नपाकीटे वाटपाचा उपक्रम हाती घ्यावा, सोशल मीडियातून मागणी.!

शिर्डी – साईबाबा संस्थांनने अन्नपाकीटे वाटपाचा उपक्रम हाती घ्यावा, सोशल मीडियातून मागणी.!

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करून आज दहा दिवस उलटले आहे. जागतिक देवस्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी शहरात हातावर पोट भरणाऱ्या रहिवाशांची संख्या 50 टक्क्यापेक्षा जास्त असून या लोकांची उपासमार टाळण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत साईबाबा संस्थांनने पुढाकार घेऊन आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेगा किचनमध्ये अन्न पाकीटे तयार करून शहरात तसेच पंचक्रोशीतील गोरगरीब नागरिकांना वाटप करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

देशात तसेच राज्यात संचारबंदी लागू आहे. शिर्डी शहर गेल्या दहा दिवसांपासून पूर्णता बंद असल्याने शहरातील अर्थव्यवस्था पूर्णता ठप्प झाली आहे. शहरात एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याहून जास्त नागरिक हातावर पोट भरणारे आहे. आज या नागरिकांवर उपासमार होण्याची वेळ उद्भवली असून घरात जेवढे होते तेवढे अन्नधान्य तसेच पैसा संपला असल्याचे सत्य समोर आले आहे त्यामुळे देशातील नंबर दोनचे देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थांनने मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टच्या आपत्कालीन परिस्थितीत अन्नपाकीटे वाटपाचा उपक्रम हाती घेऊन शिर्डीतील गोरगरीबांना उपासमारी पासून दिलासा द्यावा अशी मागणी या निमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • https://m.facebook.com/story.php?story_fbid=1529181877231283&id=623727067776773
- Advertisment -

ताज्या बातम्या