उद्या 21 देशांतील लाखो साईभक्त घेणार साईचरित्र पारायणात सहभाग
Featured

उद्या 21 देशांतील लाखो साईभक्त घेणार साईचरित्र पारायणात सहभाग

Sarvmat Digital

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- करोनाने जगाला बंदीशाळा केली असल्याने संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करित आहेत. डॉक्टर्स आणि शात्रज्ञ अहोरात्र मेहनत करून या महाभयंकर आजारावर औषध शोधण्यासाठी धडपड करित असताना आता विज्ञानाला अध्यात्माची जोड़ देत करोनाचा समुळ नायनाट व्हावा व करोनाच्या लढाईतील योध्यांना आत्मबळ मिळावे यासाठी साईनिर्माणच्यावतीने महिनाभरापासुन घर तेथे साईचरित्र या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असुन उद्या गुरूवारी भारतासह संपुर्ण जगातील 21 देशांतील लाखो साईभक्त या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे साईनिर्माण उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी माहिती दिली.

शिर्डीतील साईनिर्माण उद्योग समुहाच्या माध्यमातून आजवर देशाच्या विविध भागात दिड हज़ार गावांत सामुदायिक साईसतचरित्राचे पारायन आयोजित करून साईचरित्र वाचनाची मोठी चळवळ उभी केली आहे. या माध्यमातून लाखो साईभक्तांचा साईनिर्माण परिवारासोबत जोडले गेले आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत महामारीचे संकट दूर केले असल्याचा दाखला साईसतचरित्रात आहे.

याच पाश्वभुमीवर साईनिर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी पुढाकार घेवून माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि साईनिर्माणच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने लाँकडाऊन काळात एक महिन्यापूर्वी साईबाबांच्या शिर्डीतून घर तेथे साईसतचरित्र पारायणाची सुरवात केली. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याने त्याची व्याप्ती वाढत जावून दुसर्‍या गुरूवारी जिल्ह्यात व तिसर्‍या गुरूवारी संपूर्ण राज्यात चार लाखांच्यावर साईभक्तांनी घरात बसुन साईचरित्राचे वाचन केले. करोनाच्या संकटातून जगाला सावरावे आणि या संकटाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या योध्यांना आत्मबळ मिळावे यासाठी साईबाबांना साकडे या पारायनाच्या माध्यमातून घातले जात असल्याचे विजय कोते यांनी सांगितले.

गुरूवारी होणार्‍या पारायणासाठी देशातील साईभक्त त्याचप्रमाणे अमेरीका, युनायटेड किंगडम, कँनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान, थायलंड, मलेशिया, केनिया, तांजाविया, युगांडा, श्रीलंका, नेपाळ, आखाती राष्ट्रे, ओमान,क़तार, जर्मनी, तैवान, बार्बाडोस, मॉरीशस,़ फीजी, इंडोनेशिया, सिंगापुर इ. विदेशातील साईभक्त विश्वविक्रमी घर तेथे साईचरित्र पारायणात सहभागी होणार आहे.
– विजय कोते, संस्थापक अध्यक्ष साईनिर्माण उद्योग समुह

साईनिर्माण ग्रुपच्या पुढाकारातूने योगदान
देशभरातील 2000 गावांत सामुदायिक साईसतचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करून सुमारे 7 लाख पारायणार्थींना सहभागी करून घेत 2 लाख साईचरित्राचे वाटप करण्यात आले. 2007 ते 2016 पर्यंत 25 हज़ार साईचरित्र पारायणार्थींना 12 ज्योतिर्लिंग यात्रेचे आयोजन केले. 2009 साली मुंबई येथील बीकेसीच्या मैदानावर महासाईचरित्र पायायण सोहळ्यात महत्वाचे योगदान राहिले आहे. 2007 साली एकाच वेळी 9000 भाविकांचे साईचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले. निमगाव, रूई, शिवराई येथे भव्य दिव्य साईमंदीराच्या उभारणीत योगदान. पंढरपुर येथे साई मंदिराची उभारणी व भाविकांच्या सोयीसाठी आश्रम यासाठी पुढाकार घेतला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com