Saturday, April 27, 2024
Homeनगरभक्ताकडून तीस तोळ्यांचा सुवर्ण शंख साईचरणी

भक्ताकडून तीस तोळ्यांचा सुवर्ण शंख साईचरणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबांच्या मंदिरात प्रत्येक वस्तू दिवसेंदिवस सोन्याने मढवल्या जात आहेत. साईमंदिर सुवर्ण तेजाने झळाळले आहे. साईबाबांच्या दैनंदिन मंगल स्नानासाठी वापरण्यात येणार्‍या शंखाला दिल्ली येथील एका साईभक्तांनी तब्बल साडेबारा लाख रुपये किमतीचे 30 तोळे सोन्याचे आवरण करून सुवर्ण शंख साईमंदिरास भेट दिला.

जगभरातील लाखो भावीक शिर्डीत साईदरबारी हजेरी लावून साईबाबांना भरभरून दान देत आहेत. मागील दहा ते पंधरा वर्षांत बाबांचे सिंहासन तसेच मंदिराचा गाभारा व मंदिराच्या कळसाला सोन्याची झळाळी लागल्याने साईमंदिर सुवर्ण तेजाने झळाळले आहे. साईबाबांच्या दैनंदिन आरती, पूजा विधी यासाठी वापरण्यात येणार्‍या वस्तूही सोन्याच्या बनविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी मध्यान्ह आरतीला दिल्ली येथील साईभक्त रक्षक शर्मा यांनी हजेरी लावत साईबाबांना दैनंदिन मंगलस्नानासाठी वापरण्यात येणार्‍या शंखाला सुमारे साडेबारा लाख रुपये किमतीचे 30 तोळे सोन्याचे आवरण लावून तो सुवर्ण शंख साईमंदीरास भेट दिला. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी शंख स्विकारून साईभक्त शर्मा यांचा सत्कार केला. दरोरोज या सुवर्ण शंखाने साईबाबांना अभिषेक घातला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या