13 वर्षांनंतर संजय दत्त साईचरणी लिन
Featured

13 वर्षांनंतर संजय दत्त साईचरणी लिन

Sarvmat Digital

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- बॉलीवुडचा सुप्रसिद्ध सिनेअभिनेता संजय दत्त याने तब्बल तेरा वर्षांनंतर काल गुरुवारी मध्यान्ह आरतीनंतर शिर्डीत येऊन साईबाबांंच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

त्याच्या चाहत्यांनी त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दत्त परिवार साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. पिता सुनील दत्त हे सुद्धा नेहमीच शिर्डीत साई दर्शनासाठी येत होते. अलिकडेच बहीण प्रिया दत्त यांनी देखील साईंचे दर्शन घेतले. त्यानंतर काल दि. 6 फेब्रुवारी रोजी स्पेशल विमानाने अभिनेता संजय दत्तचे दुपारी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर शिर्डीला येऊन साईंच्या समाधीचे दर्शन घेत आरती केली.

संजूबाबा शिर्डीत येणार याची बातमी वार्‍यासारखी साईनगरीत पसरली आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्यांनी एक झलक संजूबाबाची पाहण्यासाठी गर्दी केली. साईदर्शनांनतर संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी दीपक मुगळीकर यांनी संजय दत्तचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर सुरक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे, साईनाईन क्रिकेट अकॅडमीचे संचालक साईराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिराच्या बाहेर पडताना प्रवेशव्दार क्रमांक चारने संजय दत्त निघाल्यावर यावेळी सेल्फी काढण्यासाठी ग्रामस्थ तसेच भावीकांनी त्यांचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर काहींनी संजूबाबाचा नारा देत लक्ष वेधले.

Deshdoot
www.deshdoot.com