Thursday, April 25, 2024
Homeनगरयंदा ग्रामविकासच्या बदल्या रखडणार

यंदा ग्रामविकासच्या बदल्या रखडणार

कोरोना संसर्गाचा फटका; जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षकांमध्ये आनंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गाचा फटका यंदा नगरसह राज्यातील ग्रामविकास विभागाच्या बदल्यांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 व 2 संवर्गातील अधिकार्‍यांसह जिल्हा परिषद कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता कमीच आहे.

- Advertisement -

दरवर्षी मे महिन्यांत ग्रामविकास विभागाच्या बदल्यांचा कालावधी असतो. मात्र, त्याआधी एप्रिल महिन्यांत बदलीसाठी पात्र अधिकारी कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांची माहिती ग्रामविकास विभागाकडून मागविण्यात येते. यंदा एप्रिल महिन्यांत 15 दिवस संपले असून 3 मे पर्यंत देशभर लॉकडाऊन असल्याने बदली पात्र अधिकारी आणि कर्मचारी यांची माहित

संकलित होणार नसल्याने यंदा ग्रामविकास विभागाच्या बदल्या होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामविकास विभाग आणि शिक्षकांसाठी एप्रिल आणि मे महिना चिंतेचा असतो. या कालावधीत प्रशासकीय आणि विनंती बदलीची प्रक्रिया होते. साधारणपणे दरवर्षी 15 ते 15 मे या कालावधीत जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या आणि शिक्षकांच्या बदल्या होत असतात. त्यानंतर 25 ते 31 मे या कालावधीत तालुका पातळीवरील कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या कालावधी असतो.

यासाठी एप्रिल महिन्यांत तयारी करण्यात येते. यंदा कोरोनामुळे 15 पासून जिल्ह्यातील स्थिती बिकट आहे. अशी अवस्था राज्य पातळीवर असल्याने यंदा ग्रामविकास विभागाच्या बदल्या होण्याची शक्यता कमी आहे. विभागीय पातळीवरील अधिकार्‍यांनी यास दुजोरा दिला आहे. यामुळे यंदा जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांची बदलीच्या प्रक्रियेतून सुटणार आहे. दुसरीकडे विनंती बदलीसाठी पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना याचा फटका बसणार आहे.

बदलीचा भार सरकारी तिजोरीवर
अधिकारी- कर्मचारी यांची बदलीची प्रक्रिया झाल्यानंतर प्रशासकीय बदली झालेल्या कर्मचार्‍यांना सरकारकडून प्रवास भत्ता द्यावा लागतो. हा आकडा राज्य पातळीवर मोठा होत असल्याने त्याचा अतिरिक्त खर्चाचा ताण राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतो. यंदा राज्य सरकारची अवस्था बिकट असल्याने आधीपासून कर्मचारी संघटनांनी यंदा ग्रामविकास विभागतील कर्मचार्‍यांच्या बदल्या करू नयेत, अशी मागणी सरकारकडे केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या