Friday, April 26, 2024
Homeनगरदोन दिवसांत रोहयोवर अडीच हजारांहून अधिक मजुरांची उपस्थिती

दोन दिवसांत रोहयोवर अडीच हजारांहून अधिक मजुरांची उपस्थिती

लॉकडाऊनच्या काळात 591 कामे सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राज्य सरकार पातळीवरून सूचना प्राप्त झाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांत 591 कामे सुरू करण्यात आलेली आहेत. याठिकाणी मंगळवारअखेर 2 हजार 664 मजुरांची उपस्थिती होती. महिनाभराच्या बे्रकनंतर रोहयोची कामे सुरू होताच दोन दिवसांत मोठ्या संख्येने मजूर रोहयोकडे वळाले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात यंत्रणा (महसूल) आणि जिल्हा परिषद अशा दोन स्वतंत्र यंत्रणे मार्फत रोजगार हमी योजनेची अंमलबावणी करण्यात येते. मंगळपासून जिल्हा परिषदेकडील तर त्याच्या आधी एक दिवस यंत्रणेकडील रोहयोच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषदेची 591 कामे सुरू झालेली आहेत. या कामांवर पहिल्या दिवशी 1 हजार 263 मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गाव पातळीवर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी कामे मंजूर आहेत, त्या कामांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रोहयोच्या कामा दरम्यान सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना मजुरांना आणि यंत्रणेला देण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

1 हजार 348 कामांची यादी प्रसिध्द होणार
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रोहयोवर सुरू करण्यात येणार्‍या गावनिहाय 1 हजार 348 कामांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच आज जिल्हा परिषद प्रशासन सर्व गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रोहयोच्या कामाबाबत योग्य सुचना देऊन कोणाच्या हाताला काम मिळणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देणार आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील रोहयोवर मजुरांची संख्या वाढणार आहे.

सर्वाधिक पारनेर, सर्वात कमी जामखेड
जिल्ह्यात सर्वाधिक रोहयोवर मजुरांची संख्या पारनेर तालुक्यात 438 असून त्यानंतर संगमनेर तालुक्यात 327, श्रीगाेंंदा 247, राहुरी 246, अकोले 196, नेवासा 193, पाथर्डी 190, शेवगाव 148, कर्जत 147, राहाता 145, कोपरगाव 141, नगर 128, श्रीरामपूर 86 जामखेड 33 यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या