Saturday, April 27, 2024
Homeनगरदेर्डे रांजणगाव येथे ट्रक चालकास लुटणारे तिघे जेरबंद; चौथा अल्पवयीन

देर्डे रांजणगाव येथे ट्रक चालकास लुटणारे तिघे जेरबंद; चौथा अल्पवयीन

3 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिर्डी (प्रतिनिधी)- महिंद्रा पीक व्हॅनमध्ये डिझेलचे बॅरल घेऊन देर्डे रांजणगाव येथील खडी क्रेशरला डिझेल देऊन परत संगमनेर-कोपरगाव रोडने देर्डे कोर्‍हाळे येथे जात असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मोबाईल, पिकअप व्हॅन, एटीएम कार्ड, असा 2 लाख 65 हजारांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह चार आरोपींना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले असून पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

17 मे रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास शाकीर जाकीर इनामदार (राहुरी तालुका कनगर), समृध्दी महामार्ग कॅम्प कोपरगाव हे त्यांचे सहकारी सोनू नजीर शेख व दीपक प्रभाकर सावंत यांच्यासह एमएच 45-9352 या महिंद्रा पीकअप गाडीने डिझेलचे बॅरल घेऊन देर्डे रांजणगाव येथील एमएसईबी सबस्टेशनजवळून जात असताना पाठिमागून दोन मोटारसायकलवरून चार अनोळखी इसमांनी पीकअप गाडी अडवून शाकीर इनामदार व त्यांच्या साथीदारांना गाडीच्या खाली उतरवून हत्याराने मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळील दोन मोबाईल, पीकअप गाडी व देना बँकेचे एटीएम कार्ड असा एकूण 2 लाख 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 392, 504, 506, 341, 34 अन्वये गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमारसिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार मोहन गाजरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, बाळासाहेब मुळीक पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवींद्र सोनटक्के, भागिनाथ पंचमुख, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक शिंदे, पो. कॉ.प्रकाश वाघ, संदीप चव्हाण, विजय धनेधर, चालक पोलीस हेड कॉ. संभाजी कोतकर व चालक पोलीस कॉ.सचिन कोळेकर या पोलीस पथकाने या तपासाची चक्रे फिरवली. सदरचा गुन्हा हा शिर्डी येथील लक्ष्मीनगर भागात रहात असलेला आकाश दीपक गायकवाड याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आकाश गायकवाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संदीप दिलीप राजपूत (रा. बाभळेश्वर), उमेश तान्हाजी वायदंडे (रा. गणेशनगर, राहाता) व एक अल्पवयीन मुलासह चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींकडून महिंद्रा कंपनीची पिकअप, 6 हजार रुपये कंपनीचा विप्रो कंपनी, मोबाईल, विना नंबरची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल, असा एकूण 3 लाख 31 हजारांचा ऐवज अल्पवयीन मुलासह मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या