Saturday, April 27, 2024
Homeनगरसाईडपट्ट्यांमुळे श्रीरामपूर-नेवासा मार्ग देतोय अपघातांना निमंत्रण

साईडपट्ट्यांमुळे श्रीरामपूर-नेवासा मार्ग देतोय अपघातांना निमंत्रण

साईडपट्ट्या मुरमाने भरून देण्यासाठी आमदार कानडे यांनी लक्ष घालण्याची मागणी

भोकर (वार्ताहर) – अपघातांना निमंत्रण देणार्‍या श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गाच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या अपघातास निमंत्रण देत आहेत. त्यामुळे या साईडपट्ट्या त्वरित मुरमाने भराव्यात अशी मागणी वाहन चालकांसह विविध संघटनांकडून केली जात आहे. साईडपट्ट्या खचल्याने या राज्यमार्गावर अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असल्याने आमदार लहू कानडे यांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर-नेवासा या राज्य मार्ग क्रमांक 50 वर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. श्रीरामपूर शहरापासून नेवासा पर्यंत गेल्या अनेक वर्षापासून या रोडच्या साईड शोल्डर स्कीपिंगचे काम झालेलेे नाही. तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे अनेकदा मागणी केली असता सार्वजजिक बांधकाम खात्यासह संबंधितांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रोडच्या दुतर्फा अनेक ठिकाणी सहा इंचापर्यंतच्या खटकी पडल्या आहेत.

त्यामुळे वाहन चालक कितीही अवघड परिस्थीती निर्माण झाली तरीही रोडच्या खाली उतरू शकत नाही. पर्यायाने अनेकदा समोरासमोरच अपघात होत आहेत. त्यातच याचा त्रास अनेकदा केवळ मोटारसायकल चालकांना होत आहे, त्यात अनेकजण जखमी झालेले आहे तर काहींनी जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

दरम्यान, दोन महिन्यापासून साखर हंगाम सुरू झाल्याने या मार्गावरून नियमीत ऊस वाहतुक करणार्‍या बैलगाड्या, जुगाड, डबल टेलरचे ट्रॅक्टर, ट्रक आदींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ही ओव्हरलोड वाहने रोडच्या खाली कपार व जास्त खोलगटपणा असल्याने उतरविण्यास सर्वच वाहन धारक टाळतात कारण त्यांच्यासमोर त्याशिवाय पर्याय नसतो. पर्यायाने अशा परिस्थितीत अनेकदा वाहन धारकांमध्ये वाद होतात किंवा थेट अपघात होऊन कुणी जखमी तर कधी मृत्यू ओढावल्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. याबाबत अनेकदा मागणी करूनही सार्वजजिक बांधकाम खात्याने या मागणीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलेले आहे.

अशाच प्रकारे मागणी केल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर सार्वजजिक बांधकाम खात्याने वडाळा महादेव शिवारातील रेणुकामाता मंदिराजवळील चारीपर्यंतच्या काही भागात वडाळा महादेव गावच्या बाजूने काही खेपा मुरूम टाकला होता. त्यावेळी अनेक वाहनधारकांना हायसे वाटले कारण आता वडाळा महादेव ते टाकळीभान पर्यंतच नव्हे तर थेट नेवासा पर्यंत असा मुरूम टाकल्यास वाहने खाली उतरविणे सोपे होणार व अपघात टळणार असे सर्वांनाच वाटले होते. परंतु सुमारे 200 फुटांपर्यंतच वडाळा महादेव गावाच्या बाजूने काही मुरमाच्या खेपा टाकण्यात आल्या आणि नंतर हे मुरूम टाकण्याचे काम अचानक बंद झाले.

काम सुरु असताना ‘कुठे माशी शिंकली’ कुणालाच समजले नाही ते बंद पडलेले हे मुरमाचे काम आज सुरू होईल, उद्या सुरू होईल या अपेक्षेने सर्वजण केवळ प्रतीक्षा करत राहिले पण मुरूम पडलाच नाही. शेवटी विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण मुरूम पडलाच नाही.
मतदारांनी तालुक्याची धुरा आता आमदार लहू कानडे यांच्याकडे सोपविली असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी या मागणीत लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम खात्यास या राज्य मार्गाच्या दुर्तफा खचलेल्या रस्त्यामुळे पडलेल्या खटकीत त्वरीत मुरूम भरण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने गती द्यावी. हे मुरूमाने साईडपट्ट्या भरण्याचे काम लोकप्रतिनिधींनी त्वरीत करून घ्यावे व संभाव्य अपघात टाळावे, अशी मागणी वाहन धारकांसह विविध संघटनांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या